Header AD

ड्युरोफ्लेक्‍स कडून कोविड केंद्रांसाठी समर्पित पायाभूत सुविधांचे साह्य


आपल्‍या माध्‍यमांच्‍या माध्‍यमातून आरोग्‍याला चालना 
हॉस्पिटल्‍स व कोविड - १९ केंद्रांना २००० हून अधिक मॅट्रेसेस सह व्‍हेण्टिलेटर्स व ऑक्सिजन कॉन्‍सेन्‍ट्रेटर्स दान...राष्‍ट्रीय, जून २०२१  :  संपूर्ण देश कोविड-१९ महामारीच्‍या दुस-या लाटेचा सामना करत असताना हॉस्पिटल्‍समध्‍ये आवश्‍यक संसाधनांचा तुटवडा जाणवत आहे आणि लोकांना आरोग्‍यसेवा सुविधांची नितांत गरज आहे. या अवघड काळादरम्‍यान ड्युरोफ्लेक्‍सने देशाला संकटामध्‍ये मदत करण्‍यासाठी पुन्‍हा एकदा आपली कटिबद्धता दाखवली आहे. कंपनीने देशभरात हजारो मॅट्रेसेस दान करण्‍यासोबत मुंबई व वेल्‍लोरमधील वैद्यकीय केंद्रांना व्‍हेण्टिलेटर्स व ऑक्सिजन कॉन्‍सेन्‍ट्रेटर्स देखील दान केले आहेत. 
        महत्त्वपूर्ण उपक्रम म्‍हणून कंपनीने 'ड्युरोफ्लेक्‍स केअर्स' उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत देशभरातील कोविड-१९ केंद्रांना मोठ्या प्रमाणात मॅट्रेसेसचा पुरवठा करण्‍यासाठी स्‍पेशल टास्‍क फोर्स तयार करण्‍यात आली आहे. कंपनीने कोविड-१९ मदतकार्यासंदर्भातील गरजांसाठी हेल्‍पलाइन सुरू केली आहे आणि आतापर्यंत याला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ड्युरोफ्लेक्‍सने आतापर्यंत जवळपास २००० मॅट्रेसेस दान केले आहेत आणि मागणी व आवश्‍यकतांनुसार मॅट्रेसेसचा पुरवठा सुरू ठेवणार आहे. 
           फ्रण्‍टलाइन कर्मचारी वर्गाला मदत करण्‍यासोबत ड्युरोफ्लेक्‍स केअर्स उपक्रमांतर्गत ब्रॅण्‍डचे सोशल चॅनेल्‍स देखील झोप, मानसिक आरोग्‍याबाबत सल्‍ला, पोषण व आरोग्‍याबाबत माहिती देणारे स्रोत बनले आहेत. ब्रॅण्‍ड त्‍यांच्‍या ग्राहकांना कृतीजन्‍य, व्‍यावहारिक सल्‍ला देण्‍यासाठी विविध डॉक्‍टर्स व तज्ञांसोबत सहयोग करत आहे. 
            तसेच, ब्रॅण्‍डने महामारीच्‍या तणावामुळे झोपेच्‍या वेळेवर परिणाम झालेल्‍या लोकांना पाठिंबा देण्‍यासाठी देखील उपक्रम हाती घेतला आहे. ब्रॅण्‍डने आरईएम४२ (एआय संचालित स्‍लीप कोच कंपनी) सोबत सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत साइन अप करणा-या पहिल्‍या १०० ग्राहकांना आरईएम४२ येथील पात्र स्‍लीप डॉक्‍टर्सकडून झोपेसंदर्भात मोफत सल्‍ला देण्‍यात येणार आहे.  
           या प्रयत्‍नाबाबत बोलताना ड्युरोफ्लेक्‍स प्रा. लि.च्‍या प्रमुख विपणन अधिकारी स्मिता मुरार्का म्‍हणाल्‍या, ''एक ब्रॅण्‍ड म्‍हणून आम्‍ही उद्देशाशी कटिबद्ध आहोत. आमच्‍यासाठी सीएसआर हे खरेतर बीएसआर म्‍हणजेच ब्रॅण्‍ड सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी आहे. आम्‍ही कृतीशील स्‍पेशल क्रॉस फंक्‍शनल टास्‍कफोर्स देखील तयार केली आहे. आम्‍ही या अवघड काळादरम्‍यान आपल्‍या देशाला मदतीचा हात पुढे करण्‍याशी कटिबद्ध असून या लढ्यामध्‍ये एकत्र आहोत.''           बेंगळुरू  मधील शांतीनगर मतदार  संघातील कोविड-१९ रिलीफ वॉर्डस्, मुंबईतील हेमकण्‍ट फाऊंडेशनला त्‍यांच्‍या गुरूद्वारामधील कोविड केअर केंद्रासाठी, मुंबईतील कस्‍तुरबा हॉस्पिटल, सेंट जोसेफ स्‍कूल बेंगळुरू, कोविड केंद्रे उभारणारी आंत्रेप्रीन्‍युअर्स ऑर्गेनायझेशन, ड्रीम इंडिया नेटवर्कच्‍या माध्‍यमातून मुलांची कोविड केंद्रे आणि पिरामल स्‍वस्‍थ्‍य यांना, तसेच मध्‍यप्रदेशमधील विधिशा व सिग्रॉली, झारखंडमधील पाकूर व साहिबगंज आणि जयपूर अशा नगरांना सर्वोत्तम आरोग्‍यसेवा सुविधा उपलब्‍ध होण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी २००० मॅट्रेसेस दान करण्‍यात आल्‍या आहेत.   
            ड्युरोफ्लेक्‍सने हॉस्पिटल्‍सना व्‍हेण्टिलेटर्सचा पुरवठा देखील केला आहे.  मुंबईतील होली स्पिरिट हॉस्पिटलला पाच व्‍हेण्टिलेटर्स दान करण्‍यात आले. मुंबईतील सायन हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्‍सेन्‍ट्रेटर्स दान करण्‍यात आले आहेत.
ड्युरोफ्लेक्‍स कडून कोविड केंद्रांसाठी समर्पित पायाभूत सुविधांचे साह्य ड्युरोफ्लेक्‍स कडून कोविड केंद्रांसाठी समर्पित पायाभूत सुविधांचे साह्य Reviewed by News1 Marathi on June 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads