Header AD

भारतीय विद्यार्थ्यांना हवामान बदल आणि पर्यावरण संवर्धन शिकणे महत्त्वाचे वाटते: ब्रेनली सर्व्हे
मुंबई, १४ जून २०२१ : भारतीय विद्यार्थ्यांना हवामान बदल आणि पर्यावरण संवर्धन शिकणे महत्त्वाचे वाटत असल्याचे ब्रेनली या जगातील सर्वात मोठ्या लर्निंग प्लॅटफॉर्मने केलेल्या एका सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. शालेय विद्यार्थ्यांची पर्यावरणाच्या बाबतीतील जागरूकता किती आहे हे जाणून घेण्याचा या सर्वेक्षणाचा उद्देश होता.


देशभरातील १७८१ विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळालेल्या या ऑनलाइन सर्वेक्षणातून हवामान संकट आणि ईकोसिस्टम पुनर्संचयनाविषयी तरुण भारतीयांचे विचार आणि कृती काय आहेत हे जाणून घेण्यात आले. ७९% भारतीय विद्यार्थ्यांनी हे मान्य केले की, हवामान बदलाविषयी शिकणे महत्त्वाचे आहे. तसेच पर्यावरणाच्या संवर्धंनासाठी ते कशी मदत करू शकतात हे देखील त्यांनी जाणले पाहिजे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांमधून नव्या पिढीच्या भारतीयांमध्ये काही ईको-फ्रेंडली कृतींचा समावेश आपल्या जीवनशैलीत कायमसाठी करण्याबाबतची वाढती जागरूकता दिसून आली. या कृती म्हणजे- प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करणे, जल संवर्धन, अधिकाधिक झाडे लावणे, इ. होय.


७४% मुलांनी सांगितले की, ते शाळेत पर्यावरण विज्ञान शिकतात. त्यांना अधिक झाडे लावण्यास किंवा प्लॅस्टिकचा उपयोग कमी करण्यासाठी शाळेकडून प्रोत्साहित करण्यात येत का असे विचारले असता ८६% मुलांनी होकारार्थी उत्तर दिले. सर्वेक्षणातील ८०% मुलांनी हे देखील कबूल केले की, त्यांचे माता / पिता किंवा कुटुंबातील एखादा अन्य सदस्य त्यांना त्यांच्या कृती आणि पर्यावरणावरील त्याचा प्रभाव याबाबत जागरूक राहण्यास प्रोत्साहन देतो. त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे, या सर्वेक्षणात असे आढळून आले की, ७३% मुले पर्यावरण आणि त्यासंबंधित समस्या याबाबतची आपली समज वाढवण्यासाठी ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मचा उपयोग करतात. यावरून नव्या पिढीसाठी माहिती मिळवण्याचे आणि ज्ञान शेअर करण्याचे महत्त्वाचे साधन म्हणून ब्रेनली सारख्या एडटेक संसाधनाचे वाढते महत्त्व लक्षात येते.


अर्ध्यापेक्षा जास्त (५५%) मुलांनी या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्या आसपास अधिक झाडे लावण्याचे ठरवले. या सर्वेक्षणातून हे देखील उघड झाले की, बहुतांशी विद्यार्थ्यांनी देशात लॉकडाउन लागल्यापासूनच इको-फ्रेंडली कृती / उपक्रम अंगिकारले आहेत. या उपक्रमांमध्ये प्लॅस्टिकचा वापर कमी करणे (५९%), अधिक झाडे लावणे (५८%), पाण्याचा अपव्यय टाळून जल संवर्धन (५४%), रीसायकलिंग (५२%), रेनवॉटर हार्वेस्टिंग (३०%) आणि रूफटॉप सोलार पॅनल्सचा वापर इ. चा समावेश आहे.


ब्रेनलीचे मुख्य उत्पादन अधिकारी राजेश बिसानी यांनी सांगितले की, 'आपण सध्या पर्यावरणीय संकटाच्या सावटाखाली वावरत आहोत. अशा परिस्थितीत ईकोसिस्टम पुनर्संचयनावर फोकस करण्याची गरज कदाचित यापूर्वी कधीच इतकी तीव्र नव्हती. ब्रेनलीमध्ये आम्ही तरुण विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे, क्षेत्रांचे आणि शाखांचे ज्ञान सहज मिळेल आणि शेअर करता यावे यासाठी मदत करण्यास कटिबद्ध आहोत. आपली मुले सुशिक्षित, बहुश्रुत आहेत याची खातरजमा झाल्यावरच या विश्वाला अधिक उज्ज्वल, निरोगी आणि शाश्वत भविष्याकडे घेणून जाण्याची धुरा त्यांच्या हातात सोपवण्यासाठी आपण त्यांना योग्य साधने, संसाधने आणि ज्ञानाने सज्ज करू शकतो.'

भारतीय विद्यार्थ्यांना हवामान बदल आणि पर्यावरण संवर्धन शिकणे महत्त्वाचे वाटते: ब्रेनली सर्व्हे भारतीय विद्यार्थ्यांना हवामान बदल आणि पर्यावरण संवर्धन शिकणे महत्त्वाचे वाटते: ब्रेनली सर्व्हे Reviewed by News1 Marathi on June 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads