Header AD

ठाण्यात ३० वर्षावरील नागरिकांचे उद्यापासून लसीकरण सुरु लसीकरणाचा लाभ घेण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन

                                                           



ठाणे ,  प्रतिनिधी   :  शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार ठाणे महापालिकेच्यावतीने ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उद्या दिनांक १९ जून २०२१ पासून सुरु करण्यात येत असून नागरिकांनी  या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.



            ठाणे महापालिकेच्यावतीने ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे 'वॉक इन' आणि ऑनलाईन नोंदणी पद्धतीने उद्या दिनांक १९ जून २०२१ पासून लसीकरण सुरु करण्यात येत आहे. यामध्ये ठाणे ग्लोबल हॉस्पिटल लसीकरण केंद्र, पार्किंग प्लाझा आणि विवियाना मॉल येथे ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांना दुपारी २.०० ते ४.०० या वेळेत लस देण्यात येणार आहे. 



            तर आपला दवाखाना आनंदनगर, आपला दवाखाना राबोडी, दिवा लसीकरण केंद्र, कौसा आरोग्य केंद्र आणि रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र येथे सकाळी ११.०० ते ४.०० या वेळेत 'वॉक इन' पद्धतीने लस देण्यात येणार आहे. दरम्यान महापालिकेच्या इतर लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांचे नेहमीप्रमाणे दिलेल्या वेळेत नियमित लसीकरण सुरु राहणार आहे.



ठाण्यात ३० वर्षावरील नागरिकांचे उद्यापासून लसीकरण सुरु लसीकरणाचा लाभ घेण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन ठाण्यात ३० वर्षावरील नागरिकांचे उद्यापासून लसीकरण सुरु लसीकरणाचा लाभ घेण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन Reviewed by News1 Marathi on June 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads