Header AD

आंतरराष्ट्रीय घरकामगार दिना निमित्त घरकामगार महीलांची जन संवाद सभा

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  १६ जून आंतरराष्ट्रीय घर कामगार दिनानिमित्त घरकामगार महीलांची जन संवाद सभा कल्याणमध्ये नुकतीच पार पडली.१० वर्षा पुर्वी जगभरातील घरकामगार महींलाच्या कामगार हक्का च्या लढ्याला १६ जून २०११ रोजी जिनेव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या (आय.एल.ओ ) कायदेशीर मान्यता मिळून घरकामगार हे कामगार आहेत हे जगभरातील सरकारांना मान्य करावे लागले. मग त्या त्या देशांनी त्यांच्या साठी कायदे करण्याची प्रक्रिया सुरू झालीआणि त्या मुळे आज १० वर्षांनी आपल्या देशात घरकामगार आणि विशेषतः महीला घरकामगारांनी काय मिळवले यांचा आढावा संवेदनशील व्यक्तीप्रसार माध्यमांतील सहकारीकामगार संघटनाअन्नसुरक्षा आणि सामाजिक न्याया साठीमानव अधिकारा साठी काम करणाऱ्या मित्र संघटनां समोर मांडण्याच्या उद्देशाने ही जनसंवाद सभा आयोजित केली होती.या सभेस कल्याण- डोंबिवली महापालिकाउप आयुक्त रामदास कोकरेअभियंता मिलींद गायकवाड, जेष्ठ पत्रकार बाबा रामटेकेलालबावटा रिक्षा युनियनचे कॉ.काळू कोमास्करमहाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसचे उपाध्यक्ष उदय चौधरीरेशनिंग कृती समितीचे राज्य निमंत्रक विशाल जाधवजेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ललीता आखाडे आदी मंडळी उपस्थित होती. उप आयुक्त कोकरे यांनी शुभेच्छा देतानाच शहर स्वच्छता मोहीमेत घरकामगार महीला कंपोस्ट पद्धतीने घरातल्या कच-याची विल्हेवाट कशी लावू शकतात व त्या साठीचे सोपे तंत्रज्ञान आत्मसात करुन रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करु शकतात यावर भाष्य केले. तथा यामध्ये पुढाकार घेणाऱ्या घरकामगार महीलांना पालीकेकडून सहकार्याचे आश्वासन दिले.  तर लालबावटा रिक्षा युनियनचे नेते कोमास्कर यांनी शहरातील सर्व असंघटित कामगारांच्या संघटनांचा एक मंच करुन आपल्या मागण्या शासना समोर मांडण्या साठी राजकीय दबाव गट निर्माण करावा असा प्रस्ताव सभेत मांडला या ठरावाला पांठीबा म्हणून पत्रकार बाबा रामटेके यांनी अनूमोदन देवून असंघटित कामगारांच्या या राजकीय दबाव गटाची आवश्यकता विषद केली असल्याची माहिती राष्ट्रीय घरकामगार चळवळ कल्याण विभागाचे निमंत्रक ज्ञानेश पाटील यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय घरकामगार दिना निमित्त घरकामगार महीलांची जन संवाद सभा आंतरराष्ट्रीय घरकामगार दिना निमित्त घरकामगार महीलांची जन संवाद सभा Reviewed by News1 Marathi on June 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads