Header AD

कल्याण रेल्वे स्थानकात चोरट्याला अटक

 डोंबिवली ( शंकर जाधव )  उमेशराम पटेल ( ३२ ) हे पत्नीसह १६ जून रोजी रात्री ९ वाजता  डाऊन जोधपुर- बंगलोर एक्सप्रेसने बसून प्रवास करत असताना गाडी  कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्र.६ वर काही वेळेकरता थांबली होती. या संधीचा फायदा घेत इमरान अली हुसेन सिद्धिकी ( २६ ) याने फिर्यादी उमेशराम पटेल यांच्या  पत्नीच्या हातातील लेडीज पर्स जबरीने खेचून चोरी करून पळून जात होता.         पटेल यांनी आरडा-ओरड करताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले. सदरची कारवाई वपोनि गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शेख,पवार, पोलीस नाईक कर्डिले, माने, पोलीस शिपाई चव्हाण, सुरवसे, पाटील, कल्याण रेल्वे सुरक्षा बलाचे जवान सैनी, कॉन्स्टेबल जितेंद्र सिंग, योगेश कुमार यांनी केली.

कल्याण रेल्वे स्थानकात चोरट्याला अटक कल्याण रेल्वे स्थानकात चोरट्याला अटक Reviewed by News1 Marathi on June 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads