Header AD

टीम परिवर्तन आणि मान सन्मान प्रतिष्ठाणच्या माध्यमाने अनोखी दंतचिकित्सा दहिवली येथे आयोजित केले दंतचिकित्सा शिबीर

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  टिटवाळा येथील दहिवली या गावांत नुकताच टीम परिवर्तन व मान सन्मान प्रतिष्ठाण या युवकांच्या गटाच्या प्रयत्नांतून अनोखा दंतचिकित्सा कार्यक्रम घेण्यात आला. कल्याण येथील दंत चिकित्सक डॉ. नेहा डोंगरे खडकबाणडॉ. किरण जाधव आणि डॉ. अदिती माळुजंकर यांनी यावेळीं जमलेल्या सर्व मुलांची आणि गावकऱ्यांची दातांची तपासणी केली.


लहान मुलांनी प्रामुख्याने आपल्या दातांची काळजी कशी घ्यावीदिवसांतून किती वेळा दात घासावेत आणि कशा पद्धतीने घासावेत यांची प्रात्यक्षिके यावेळीं मुलांना समजावून सांगितले. या दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन टीम परिवर्तन व मान सन्मान प्रतिष्ठाणच्या माध्यमाने करण्यात आले होते. टीम परिवर्तनचे तुषार वारंगभुषण राजेशिर्केमंगेश तिवारीअविनाश पाटील यावेळीं उपस्थित होते. यावेळीं १०० पेक्षा अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आणि त्याचबरोबर सर्वांना मोफत पेस्ट आणि ब्रशचे वाटप करण्यात आले.


दात घासण्यासाठी मुलांनी ब्रश आणि पेस्टशिवाय इतर कोणत्याही साहित्याचा वापर करू नये हा सल्ला देखील उपस्थित मंडळींना यावेळीं देण्यात आला. ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना मौखिक स्वच्छता आणि चांगल्या आरोग्यासाठी दातांची निगा राखणे का गरजेचे आहे यांची माहिती देखील डॉ. नेहा डोंगरे खडकबाण यांनी यावेळीं उपस्थितांना दिली. दहिवली येथील युवा संस्कार बहुउद्देशीय संस्थेचे विशेष सहकार्य या दंतचिकित्सा शिबिरासाठी लाभले.


मौखिक आरोग्याची काळजी घेणे का आवश्यक आहे यांची माहिती आजच्या शिबिरात आमच्या ग्रामस्थ मंडळींना मिळाली त्यांचा निश्चित त्यांना फायदा होईल असे सोमनाथ राऊत यांनी यावेळीं सांगितले. मान सन्मान प्रतिष्ठाणचे भावेश पैठणेसुमित त्रिपाठीसंजय जांगळीमालोजी बोडकेहर्षद फालेअतुल राऊत यावेळी उपस्थित होते. सर्व उपस्थित मुलांना यावेळी मास्क आणि केकेचे वाटप देखील करण्यात आले.

टीम परिवर्तन आणि मान सन्मान प्रतिष्ठाणच्या माध्यमाने अनोखी दंतचिकित्सा दहिवली येथे आयोजित केले दंतचिकित्सा शिबीर टीम परिवर्तन आणि मान सन्मान प्रतिष्ठाणच्या माध्यमाने अनोखी दंतचिकित्सा दहिवली येथे आयोजित केले दंतचिकित्सा शिबीर Reviewed by News1 Marathi on June 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads