Header AD

कॉंग्रेसच्या वतीने गरिबांना अन्नदान

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी  यांच्या वाढदिवसा निमित्त युवक काँग्रेस डोंबिवली विधानसभा अध्यक्ष पमेश एकनाथ म्हात्रे  यांच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील इंदिरानगर झोपडपट्टी येथे गरीब लहान मुलांना अन्नदान केले.




     यावेळी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अखिलेश भोईरसदस्य अभय तावरे,डोंबिवली ब्लॉक काँग्रेस उपाध्यक्ष शरद भोईर, सचिव -गौरव माळी, राकेश वायंगणकर आणि संतोष म्हात्रे आदि उपस्थित होते.यावेळी पमेश म्हात्रे म्हणाले,कॉंग्रेस नेहमीच गरिबांसाठी उभी राहिली आहे.गरीब आणि गरजूंना मदत करताना कॉंग्रेस पक्षाने हात आकडता घेतला नाही. कोरोना काळात जनतेचे आर्थिक स्थिती बिकट झाली आहे.कॉग्रेसपक्ष शक्य होईल तितकी मदत करत आहे.

कॉंग्रेसच्या वतीने गरिबांना अन्नदान कॉंग्रेसच्या वतीने गरिबांना अन्नदान Reviewed by News1 Marathi on June 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads