Header AD

सूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार ? रिपाइंच्या जन आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी


 


डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील  सुतिकागृहाच्या मोडकळीस आलेल्या वास्तुला सात वर्षे होऊनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. गोर-गरीब महिलांच्या प्रसूतीसाठी हक्काचं रुग्णालय होते. पालिका प्रशासनाने ही धोकादायक वास्तू म्हणून जाहीर केल्याने सुविधा बंद झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.या वस्तू पुनर्निर्माण करण्यास खूपच विलंब होत असल्याने शिवसेना-भाजप व प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त आहेत.


        या गंभीर प्रने प्रश्नाकडे रिपाइंने लक्ष दिले आहेत.प्रशासनाने या सुतिकागृहा बाळंतपण कधी करणार असा प्रश्न उपस्थित करत यावर लवकरात लवकर तोगडा काढला नाही तर मोठे जनआंदोलन करू आणि यात आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी होतील असे  रिपाइं डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी सांगितले.   


 

       डोंबिवली पूर्वेला टिळक मार्गावर सुतिका गृहाची मोडकळीस आलेली ही वास्तु पाच वर्षांपूर्वी धोकादायक म्हणून घोषित केली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्ष हे सुतिका गृह बंद आहे.शहर परिसरातील गरीब महिलांसाठी उपलब्ध असलेली प्रस्तुती गृहाची सुविधा बंद झाल्याने महिला वर्गाची नाहक हाल होत आहेत. सुतिकागृह पुनर्विकास कामासाठी चालना २१ ऑक्टोबर २०१४ ला मिळाली.          याबाबतचा ठराव महासभेत २० ऑगस्ट २०१६ रोजी झाला. चार वेळा स्वारस्य फेटाळण्यात आले. अखेर २५ फेब्रुवारी २०२० ला रुबी हेल्थ केअर यांनी सुतिकागृह विकसित करण्याचे ठरविले होते.परंतु अद्यापपर्यंत हे काम का रखडले आहे म्हणून दुर्लक्षित सुतिकागृहाबाबत डोंबिवली रिपाई शहर तर्फे जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

सूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार ? रिपाइंच्या जन आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी सूतिकागृहाचे बाळंतपण कधी होणार ?  रिपाइंच्या जन आंदोलनात गरोदर महिला होणार सहभागी Reviewed by News1 Marathi on June 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads