Header AD

डोंबिवली तील कारखान्यातील जल प्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु..

 डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली सांडपाणी उदंचन प्रकिया केंद्रात डोंबिवली एमआयडीसी मधील कारखान्यामधील केमिकल मिश्रित सांडपाण्यामुळे प्रदूषणाचा तक्रारी केल्या येत असतात. हा प्रश्न  प्रमाणात सोडविण्यासाठी कामा संघटनेने उद्चन केंद्रात डोंबिवलीतील कारखान्यातील जलप्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु केला आहे.या प्रकल्पामुळे कारखान्यातील  पाणी प्रदूषणावर मात होईल असा दावा कामा संघटनेने केला  आहे. या प्रकल्पाचे  उद्घाटन कामाचे अध्यक्ष देवेन सोनी यांच्या हस्ते झाले.          यावेळी यश फाउंडेशनचे अध्यक्ष केतन पटेल,उपाध्यक्ष यश पटेल, नरेंद्र पटेल, डोंबिवली औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे चेअरमन देवेन सोनी,मॅनेजमेंट डायरेकटर उदय वालावलकर, नारायण टेकाडे, राजू बेल्लोर,कमळ कपूर, चांगदेव कदम,मुरली अय्यर, राहुल कासलीवाल,डॉ. निखील धूत आदि उपस्थित होते.  डोंबिवली औद्योगिक प्रक्रिया केंद्र आणि कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोशिएश्न तर्फे उभारण्यात आलेल्या प्लांटचे तीन टाक्यात वर्गीकरण करण्यात आले आहे.          सांड पाणी मिश्रित पाणी पाईपद्वारे प्रत्येक टाकीत वर्गीकृत करण्यात आले आहे. ठिबक सिंचन प्रक्रीयेने आलेले पाणी टाकीत लावण्यात आलेल्या झाडांमुळे केमिकलयुक्त पाण्यावर वनस्पतीच्या उत्सर्जन प्रक्रीयेमुळे मिश्रित पाण्यातील कार्बनडाय ऑक्साईड प्रमाण कमी होवून पाणी स्वच्छ होते.हा प्लांट उभारणीस सुमारे १८ लाख रुपये खर्ची लागले असून दहा हजार लिटर स्वच्छ पाणी वापरासाठी मिळणार आहे.याचा उपयोग झाडांसाठी किंवा इतर कामांसाही होवू शकतो. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता येथील सुमारे १५० केमिकल कंपन्याना स्वतःच्या कंपनीत करता येईल असा विश्वास सोनी यांनी व्यक्त केला.         या प्लांट मधील दहा चौरस मीटर असलेल्या टाक्यात पाचशे झाडे लावण्यात आली असून त्यांची देखभाल केली जाणार आहे.या झाडांमध्ये काही औषधी वनस्पतीही लावण्यात आल्या आहेत.या प्रक्रीयेसाठी यश फौंडेशन औरंगाबाद यांनी तांत्रिक बाजू उपलब्ध करून दिल्याचेही सोनी यांनी सांगितले.या प्रक्रियेत हे सूक्ष्मजीव सर्व प्रकारचे रसायन आणि रंग देखील फस्त करतात.ज्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या मर्यादेत किंवा त्यापेक्षा कितीतरी कमी प्रदूषित पाणी बाहेर पडते. या प्रक्रियेत सांडपाण्यातील रसायनांवर  जगणाऱ्या  सूक्ष्म  जीवाचा  वापर करण्यात आला आहे. हे सूक्ष्मजीव मातीत मिसळवत कंपन्यातील घातक पाणी या प्लांटमध्ये ठरावीक प्रेशरने सोडले जाते.
    हे सूक्ष्मजीव सांडपाण्यातील केमिकल फस्त करतात.मातीत मुरलेले हे पाणी पुन्हा पाईपच्या मदतीने तशाच दुसऱ्या आणि नंतर तिसऱ्या प्लांटमध्ये सोडले जाते.या प्रक्रियेत हे सूक्ष्मजीव सर्व प्रकारचे रसायन आणि रंग देखील फस्त करतात.ज्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या मर्यादेत किंवा त्यापेक्षा कितीतरी कमी प्रदूषित पाणी बाहेर पडते.संपूर्णपणे,नैसर्गिकरित्या होणाऱ्या या शुद्धीकरण प्रकल्पात विजेचा किंवा कोणत्याही महागड्या मशिनरीचा वापर केला जात नसल्यामुळे हि कमी खर्चिक आणि लाभदायक प्रक्रिया ठरणार आहे.

डोंबिवली तील कारखान्यातील जल प्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु.. डोंबिवली तील कारखान्यातील जल प्रदूषण नियंत्रित करणारा सूक्ष्मजीव तंत्रज्ञान प्रकल्प सुरु.. Reviewed by News1 Marathi on June 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads