कल्याण डोंबिवलीत कोरोना मृतांनी ओलांडला २२०० चा आकडा१३३ नवे रुग्ण तर ३ मृत्यू ४८ रुग्णांना डिस्चार्ज

 कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा कोरोना मृतांच्या संख्येने २२०० चा आकडा ओलांडला असून आज १३३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ४८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज ३ मृत्यू झाले आहेत.आजच्या या १३३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ७७८ झाली आहे. यामध्ये १५१४ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३१ हजार ०६२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-११, कल्याण प – ३९डोंबिवली पूर्व  ४४डोंबिवली प – २२, मांडा टिटवाळा – १३, तर मोहना येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments