Header AD

तृतीयपंथीसाठी महापालिकेचे राज्यातील पाहिलं विशेष लसीकरण सत्र

 

◆पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील तृतीयपंथीचे लसीकरण...ठाणे , प्रतिनिधी  :  लसीकरण मोहिमेंतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात येत असून तृतीयपंथीसाठीचे राज्यातील पाहिलं कोरोना प्रतिबंधक लसीकरण सत्र आज राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पार्कींग प्लाझा येथे संपन्न झाले. 


          

          यावेळी उप महापौर सौ.पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू  टावरी आदी उपस्थित होते. शहरातील तृतीयपंथी लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रावर ‘’विशेष लसीकरण सत्र’’ आयोजित करण्यात आले होते.


    

              या लसीकरण मोहिमेंतर्गत स्वतःचे आधारकार्ड आणि इतर कोणतेही ओळखपत्र असणाऱ्या तसेच ओळखपत्र नसलेल्या तृतीयपंथीना देखील महापालिकेच्या पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रावर लस देण्यात आली.आज एकूण शहरातील १६ तृतीयपंथीना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी उपस्थितीत सर्व तृतीयपंथीनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले. 

तृतीयपंथीसाठी महापालिकेचे राज्यातील पाहिलं विशेष लसीकरण सत्र तृतीयपंथीसाठी महापालिकेचे राज्यातील पाहिलं विशेष लसीकरण सत्र Reviewed by News1 Marathi on June 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads