Header AD

प्रा. डॉ. दीपक बनसोड यांना राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज विशेष पुरस्कार जाहीर

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  इंडियन स्टुडंट कौन्सिल च्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त सामाजिकशैक्षणिकसांस्कृतिक  क्षेत्रात उल्लेखनीय कामा करणाऱ्या आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार पेरणाऱ्या व्यक्तींना २०२१ चा पुरस्कार जाहीर करण्यात आला. प्राध्यापक डॉ. दीपक भास्कर बनसोड यांना संशोधन क्षेत्रातील राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू विशेष हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.डॉ. दीपक बनसोड हे के. बी. कला आणि वाणिज्य महाविद्यालयठाणे येथील इतिहास विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे २० वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असून भारतातील दलित चळवळ, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जर्नल्समधील २० हून अधिक शोधनिबंधांचे सादर केले आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषद आणि सेमिनारमध्ये त्यांनी ३० हून अधिक संशोधन पेपर  सादर केली आहेत. त्यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेतून जर्नल दोन खंडामध्ये संपादीन केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातून ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांनी इतिहास या विषयातून,पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.  त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत लघु संशोधन प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले. आसामच्या कन्या महाविद्यालयाने आयोजित केलेल्या २१ व्या शतकात जेंडर इश्यू अँड प्रवचन या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्कृष्ट पेपर देण्यात आला या सर्वांचा विचार करून इंडियन स्टुडंट कौन्सिल च्या वतीने यांना २०२१ चा संशोधन क्षेत्रातील राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज संशोधन क्षेत्रातील विशेष हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.  डॉ. दीपक बनसोड यांच्यासह प्रा.डॉ. दीपक चिद्दरवारऋग्वेदी  प्रधानप्रा.डॉ. चेतन राऊत यांना देखील हा पुरस्कार मिळाला असून हे सर्व पुरस्कार थोर विचारवंत, साहित्यिक समीक्षक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी जाहीर केले. इंडियन स्टुडंट्स कोन्सिलचे अध्यक्ष डॉ.ज्ञानोबा कदम, कार्यवाह प्रा. मयुरी कुंभार, सहसंघटक विश्वजीत घाटविसावे, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. बबन सिनगारेसोनाली अवसरमोलरजनी पोयाम,  रेश्मा आंबेकरपूजा मुटे डॉ. राजश्री देशपांडेमनोज हिवाळे आदींनी या सर्वांचे अभिनंदन  केले आहे. 

प्रा. डॉ. दीपक बनसोड यांना राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज विशेष पुरस्कार जाहीर प्रा. डॉ. दीपक बनसोड यांना राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज विशेष पुरस्कार जाहीर Reviewed by News1 Marathi on June 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads