Header AD

बल्याणी परिसरातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

 कल्याण , कुणाल  म्हात्रे   :   वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांना प्रभावित होऊन बल्याणी परिसरातील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे.   यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ मानकरजिल्हा प्रवक्ता बी.बी.प्रधानजिल्हा सचिव विश्वास सदाफुलेजिल्हा महिला अध्यक्षा माया कांबळेतालुका महिला अध्यक्षा मनीषा जाधवकल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष संतोष गायकवाडजिल्हा समन्वयक दिपक खांबेकरधिवरेनिसार खान, मोहम्मद साकीर, वार्ड अध्यक्षा मिना खराटे, सुनिता विशवेअंबिवली शहर महासचिव लिना पाटोळे सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हुंबरे आदीजण उपस्थित होते.  वंचित बहुजन आघाडी हा बहुजन समाजाचा पंक्ष आहे. सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन अडी अडचणी व समस्या सोडवायच्या आहेत.  प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आम्ही आभिनंदन करतो असे मत यावेळी जिल्हा उपाध्यक्ष डॉ मानकर यांनी व्यक्त केले.  प्रवेश केलेल्यांमध्ये सुरेखा पाटीलमोनिका भावेकमला पाटीलशकीला शेखरिटा गुप्तारंजना शिंदेरेशमा खानअदालत भाईमोहम्मद सलीम,विमल विश्वकर्मा, जिजाबाई गवळीलता वाघे आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे आयोजन कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी केले होते.

बल्याणी परिसरातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश बल्याणी परिसरातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश Reviewed by News1 Marathi on June 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads