Header AD

कचराच न उचलल्याने मच्छी मार्केट मध्ये पसरल्या आळ्या व्यावसायिक आणि ग्राहकांचे आरोग्य धोक्यात

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याणच्या छाया टॉकीज जवळील मच्छी मार्केट मधला कचरा गेल्या ८ दिवसांपासून न उचलल्याने त्याठिकाणी अक्षरशः आळ्यांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी याठिकाणी व्यवसाय करणारे मच्छीविक्रेते आणि याठिकाणी खरेदीसाठी येणारे ग्राहक दोघांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.कल्याण पश्चिमेला रेल्वे स्टेशनच्या नजदीक असणारे हे मच्छी मार्केट बरेच जूने असून याठिकाणी १०० हून अधिक मच्छी विक्रेते आणि महिला व्यवसाय करत आहेत. मच्छीबरोबरच याठिकाणी चिकन आणि मटण विक्रीही केली जाते. कल्याणातील महत्वाच्या मार्केटपैकी एक असणाऱ्या या मार्केमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मच्छीमटणचिकन विक्री होत असते. त्यामुळे दररोज त्याच्याशी संबंधित टाकाऊ कचराही मोठ्या प्रमाणात पडत असतो.मात्र गेल्या ८ दिवसांपासून हा सर्व कचरा उचललाच न गेल्याने याठिकाणी अक्षरशः प्रचंड प्रमाणात दुर्गंधी तर पसरली आहेच. पण आता त्याजोडीला हा सर्व कचरा सडू लागल्याने पांढऱ्या रंगाच्या मोठ्या आळ्याही झाल्या आहेत. संपूर्ण मार्केमध्ये या आळ्या पसरल्या असून त्यामुळे विक्रेते आणि ग्राहक दोघांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.यासंदर्भात महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागाला वारंवार हा कचरा उचलण्यासाठी कळवले. मात्र त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली.

कचराच न उचलल्याने मच्छी मार्केट मध्ये पसरल्या आळ्या व्यावसायिक आणि ग्राहकांचे आरोग्य धोक्यात कचराच न उचलल्याने मच्छी मार्केट मध्ये पसरल्या आळ्या व्यावसायिक आणि ग्राहकांचे आरोग्य धोक्यात Reviewed by News1 Marathi on June 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads