Header AD

डिजिटल शोरूमची ऑफलाइन व्यापा-यां करिता सुविधा


व्यवसायांना फोनच्या माध्यमातून स्वतःची वेबसाइट देणारा भारताचा पहिला ओ२ओ ब्रॅंड बनला ~मुंबई, १४ जून २०२१ : देशाच्या काना-कोप-यातील ऑफलाइन व्यापा-यांना त्यांच्या व्यापारासाठी अगदी अनुरूप अशी एक वेबसाइट अगदी सुलभतेने आणि कमीत कमी खर्चात अगदी तयार बनवून देण्यासाठी ओ२ओ कॉमर्स ब्रॅंड डिजिटल शोरूमने त्यांच्या हायब्रिड मॉडेलसाठी कस्टम डोमेन खरेदी आणि इतर अनेक फीचर्स सुरू केली आहेत. यामुळे डिजिटल शोरूम व्यापा-यांना त्यांच्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून अवघ्या १५ मिनिटांत त्यांच्या बिझनेस वेबसाइटसाठी कस्टम डोमेन नाव तसेच प्रीमियम थीम देणारे भारताचे पहिले फुल-स्टॅक कॉमर्स सोल्युशन बनले आहे.           अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर उपलब्ध असलेले डिजिटल शोरूम गेल्या सप्टेंबरमध्ये डॉटपे द्वारा लॉन्च करण्यात आले होते. याचा उद्देश होता ऑफलाइन व्यापा-यांना त्यांच्या ग्राहकांशी ऑनलाइन संवाद साधून आपला व्यापार डिजिटल माध्यमातून व्यवस्थापित करणे. स्थापनेपासून देशभरातील ५ मिलियनपेक्षा जास्त व्यापा-यांनी या अॅपवर आपल्या दुकानाचे नाव, नंबर आणि पत्ता दाखल करून नावनोंदणी केली आहे आणि लागलीच ऑनलाइन विक्री करण्यास सुरुवात केली आहे. डिजिटल शोरूमवरील व्यापारी ३८ कोटी रु. पेक्षा जास्त रकमेचे मासिक व्यवहार करत आहेत.       डॉटपेचे सह-संस्थापक आणि सीईओ श्री शैलाझ नाग म्हणाले, 'डिजिटल शोरूमच्या लॉन्चपासून या ब्रॅंडने या उद्योगात अनेक नवीन गोष्टी केल्या आहेत. एका वर्षापेक्षा कमी अवधीत ५ मिलियन+ व्यापा-यांना सक्षम करणारा हा पहिला ओ२ओ ब्रॅंड होता. इतक्या मोठ्या प्रमाणात टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये शिरकाव करणार्‍या ब्रॅण्ड्सपैकी तो एक होता. आणि आज तो भारताचा पहिला फुल-स्टॅक कॉमर्स सोल्युशन्स ब्रॅंड बनला आहे, जो फोनच्या माध्यमातून आपल्या व्यापा-यांना त्यांची स्वतःची वेबसाइट देतो. टियर २ आणि टियर ३ शहरांमधल्या अनेक व्यापा-यांना पहिल्यांदाच त्यांची स्वतःची वेबसाइट आम्ही मिळवून दिली. देशाच्या काना-कोप-यातील सगळ्या व्यापा-यांना मदत करण्यासाठी इनोव्हेशनचा मार्ग आम्ही खुला करत राहू अशी आम्हाला आशा आहे.'

डिजिटल शोरूमची ऑफलाइन व्यापा-यां करिता सुविधा डिजिटल शोरूमची ऑफलाइन व्यापा-यां  करिता सुविधा Reviewed by News1 Marathi on June 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads