Header AD

शिवसेनेला संपवण्याची वल्गना करणारे स्वतःच संपले शिव सेनेचा भाजपला टोला

डोंबिवली ( शंकर जाधव ) जे शिवसेनेच्या जीवावर मोठे झाले ते शिवसेना संपविण्याची भाषा करत आहेत.ज्यांनी शिवसेना संपण्याच्या वल्गना केल्या ते स्वतःच संपले हा इतिहास आहे अस टोला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे कधी काळी मित्र असलेल्या भाजपला नाव न घेता लगावला.डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या वतीने शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी थरवळ यांनी प्रतिपादन केले.         शिवसेनेच्या वतीने मध्यवर्ती शाखेजवळील भगव्या झेंड्यांचे ध्वजारोहण शिवसैनिकांच्या हस्ते केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवसैनिकांना आणि नागरिकांना शुभेच्छा देताना उपजिल्हाप्रमुख थरवळ म्हणाले कि,गेली ५५ वर्ष शिवसेना सत्ता असो वा नसो सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण अंखडपाने कार्यकर्त आहेत.गेली ५५ वर्ष शिवसैनिक अविरतपणे या कार्याची धुरा सांभाळत आहेत.       स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वासाठी समर्थपाने उभी केली.  तेच सूत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरु ठेवले आहे.आपल्याला औरंगजेबाचा इतिहास माहित आहे.जे शिवसेनेच्या जीवावर मोठे झाले,ते आता शिवसेना संपवण्याची भाषा करत आहेत.ज्यांनी ज्यांनी शिवसेना संपण्याच्या वल्गना केल्या ते स्वतः संपले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडी सरकारची जबाबदारी समर्थपने पेलली आहे.          ठाणे जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ते जरी हयात नसले तरी  त्यांचे स्मरण करून आजच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा आणि नागरिकांना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी दिल्या. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे,प्रभाकर चौधरी, संतोष चव्हाण, किशोर मानकामे,आरती मोकल,कविता गावंड,मंगला सुळे,किरण मोंडकर,दीपक भोसले,वसंत भगत आदी उपस्थित होते.

शिवसेनेला संपवण्याची वल्गना करणारे स्वतःच संपले शिव सेनेचा भाजपला टोला शिवसेनेला संपवण्याची वल्गना करणारे स्वतःच संपले शिव सेनेचा भाजपला टोला Reviewed by News1 Marathi on June 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads