Header AD

भटाळे तलावाच्या उपोषणाला माजी आमदार नरेंद्र पवारांचा पाठींबा

 

■तलावातील अतिक्रमणा विरोधात आमरण उपोषणाचा तिसरा दिवस...



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण मधील भटाळे तलावाच्या अतिक्रमणा विरोधात गेल्या तीन दिवसांपासून सामजिक संस्थेचे आमरण उपोषण सुरु असून या उपोषणाला माजी आमदार नरेंद्र पवार यांनी भेट देत पाठींबा दर्शविला आहे. तसेच या तलावावर असलेले अतिक्रमण त्वरित हटवून कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.



          भटाळे तलाव हा कल्याण मधील ऐतिहासिक तलाव असून याठिकाणी अनधिकृत बांधकाम झाले आहे. याठिकाणी अनधिकृत तबेले आहेत, अनधिकृतपणे घोडे बांधले जातात. यामुळे तलाव नष्ट झाला असून हि अतिक्रमणे हटवून संबंधितांवर कारवाई करून या तलावाचे सुशोभिकरण करण्याची मागणी यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.      



 ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या समोर असलेल्या या तलावात देखील भूमाफियांनी अतिक्रमण केले असून याविरोधात निर्भय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयपाल कांबळे, ठाणे जिल्हा अध्यक्षा आसीया रिझवी आणि इतर कार्यकर्ते हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणाला बसले आहेत.

भटाळे तलावाच्या उपोषणाला माजी आमदार नरेंद्र पवारांचा पाठींबा भटाळे तलावाच्या उपोषणाला माजी आमदार नरेंद्र पवारांचा पाठींबा Reviewed by News1 Marathi on June 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads