Header AD

एक्सप्रेस मधील महिलेची पर्स चोरणाऱ्या चोराला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  चालत्या एक्सप्रेस मधून महिलेची पर्स चोरून पळणाऱ्या चोरास कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी पकडल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली आहे. चोरटय़ाचे नाव इमरान अली सिद्दीकी असे असून तो टिटवाळा येथे राहणारा आहे. काही दिवसापासून रेल्वेत चोरी आणि लूटीच्या घटना मोठय़ा प्रमाणात वाढल्याने ही एक चिंतेची बाब आहे.बुधवारी जोधपूर एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात थांबली. जालाराम पटेल आणि त्यांचे कुटुंबीय या एक्सप्रेसमधून जोधपूरहुन कर्नाटकला जात होते. थोडय़ाच वेळात ट्रेन सुरु झाली. ही संधी साधत चोरटा ट्रेनमध्ये घुसला. त्याने पटेल यांच्या वाहिनीची पर्स हिसकावून पळ काढला. कल्याण रेल्वे स्थानकात प्लॅटफार्म चार पाचवर ही घटना घडली. कल्याण रेल्वे क्राईम ब्रांन्चचे काही पोलिस कर्मचारी त्याठिकाणी गस्त घालत होते. त्यांची नजर या चोरटय़ावर गेली. त्यांनी त्वरीत त्याचा पाठलाग केला. ट्रॅकवरुन या चोरट्याला रंगेहाथ पकडले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.चोरटय़ाचे नाव इमरान अली सिद्दीकी असून तो टिटवाळ्य़ात राहतो. त्याच्याकडून चोरलेली पर्स हस्तगत करण्यात आली आहे. त्यात पाच मोबाईल आणि दागिने हा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. सध्या हा चोरटा कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याच्या ताब्यात असून पुढील करावाई सुरु असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशनचे व.पो.नि. वाल्मिक शार्दुल यांनी दिली. 

एक्सप्रेस मधील महिलेची पर्स चोरणाऱ्या चोराला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले एक्सप्रेस मधील महिलेची पर्स चोरणाऱ्या चोराला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले Reviewed by News1 Marathi on June 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads