Header AD

नॉन-स्टॉप मनोरंजनासाठी टॉप स्ट्रीमिंग आणि शॉर्ट व्हिडिओ अॅप्स
देश विदेश ; जागतिक महामारीमुळे अनेक उद्योगांना फटका बसला असला तरी, डिजिटल दुनियेसाठी मात्र ती वरदानरूप ठरली आहे. सर्व जण आपापल्या घरात बंद असल्यामुळे मनोरंजन आवश्यक ठरले आहे. अशा वेळी लाइव्ह स्ट्रीमिंग अॅप लोकांना शेअर करायला, कनेक्ट करायला आणि एकमेकांशी थेट संपर्क साधायला मदत करत आहेत. नॉन-स्टॉप मनोरंजनासाठी टॉप लाईव्ह स्ट्रीमिंग आणि शॉर्ट व्हिडिओ अॅप्स पुढीलप्रमाणे आहेत.नेटफ्लिक्स: नेटफ्लिक्स एक स्ट्रीमिंग सेवा आहे, ज्यात लोकप्रिय शो, आजवरचे उत्तमोत्तम चित्रपट आणि नेटफ्लिक्सचे ओरिजनल शो यांचा संग्रह आहे. शीर्षकावरून चित्रपट शोधता येतो. हा संग्रह निरंतर वाढत चालला आहे, कारण नवे एपिसोड प्रसारित झाल्या झाल्या यात दाखल होतात. हे सर्व प्लॅटफॉर्म्सवर काम करते, त्यामुळे कोणत्याही डिव्हाइसवर ते पाहता येऊ शकते. एका डिव्हाइसवर बघायला लागा आणि मग दुसर्‍या डिव्हाइसवर पुढचा भाग बघा, हे ही शक्य आहे. यावरील सेवा जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक महिन्याचा ट्रायल अवधी मिळतो. तुम्ही आपल्या पसंती-नापसंती अनुसार शो किंवा चित्रपटाचे रेटिंग करा, ज्याच्या मदतीने नेटफ्लिक्स तुम्हाला इतर चांगले शो सुचवू शकेल.गूगल प्ले बुक्स: पुस्तक वाचनाचा आनंद काही आगळाच असतो. पण, तुम्ही आराम करत असताना कोणी तरी तुम्हाला गोष्ट सांगत असेल तर ते ही छानच की. ऑडिओ बुक्सच्या व्यापक संग्रहातील पुस्तके ऐका. ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर काम करते, त्यामुळे तुम्ही केव्हाही आणि कुठेही ही पुस्तके अॅक्सेस करू शकता. यामध्ये ई-बुक्स, कॉमिक्स आणि टेक्स्टबुक्सचा संग्रह आहे. हा संग्रह अॅक्सेस करण्यासाठी तुमच्याकडे कोणतेही सदस्यत्व असण्याची गरज नाही. आपल्या स्क्रीनचा रंग आणि ब्राइटनेस अॅडजस्ट करण्यासाठी नाइट लाइट सेटिंग सेट करता येऊ शकते.जेएल स्ट्रीम: जेएल म्हणजे जल्दी लाइव्ह – हे एक सोशल लाइव्ह स्ट्रीमिंग मोबाइल अॅप आहे, जे यूझर्सना आपली प्रतिभा स्ट्रीम करण्याची, इतरांना आपल्याला शोधण्याची, चॅट करण्याची, लोकांशी कनेक्ट होण्याची, मित्र बनवण्याची आणि कमावण्याची संधी देते. जेएल स्ट्रीम एक सहज इंटरॅक्टिव्ह लाइव्ह स्ट्रीमिंग युजीसी प्लॅटफॉर्म प्रदान करते, जेथे यूझर एका बटणाच्या क्लिकवर ब्रॉडकास्ट करू शकतात. जेएल स्ट्रीमवर यूझर कोणत्याही वेळेस, कुठेही स्ट्रीम करू शकतो, आपली प्रतिभा प्रदर्शित करू शकतो, आपल्या प्रेक्षकांसाठी शाउट-आऊट करू शकतो आणि तत्काळ कॅश आऊट सह पैसे कमवू शकतो. या अॅपमध्ये ‘कीप इट सिंपल स्ट्रीमर’चे प्रतीक आहे. ते युझर्सना आपल्या प्रतिभेचा एक छोटा व्हिडिओ शेअर करण्याचा पर्याय देते तसेच त्यांच्या परिचयासह ते इतरांना लवकर शोधता यावेत यासाठी मदत करते.हिपी: पॅशन आणि सृजनशीलता यांचे प्रतीक असलेल्या झीने देशातील हे लाडके क्रिएटर डेस्टीनेशन हिपी सादर केले आहे. मेड फॉर इंडिया, बाय इंडिया असे हायपाय एक आकर्षक, विश्वसनीय आणि सुरक्षित लघु व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे, जेथे यूझर्स स्वतंत्रपणे स्वतःस अभिव्यक्त करू शकतात. तुम्हाला फक्त तुमचा स्वॅग दाखवायचा आहे. आणि मौज, प्रसिद्धी आणि मनोरंजनाच्या प्रवासाला निघण्यासाठी सज्ज व्हायचे आहे. अमर्याद मनोरंजन, सुलभ, दर्जेदार व्हिडिओ मेकर आणि मजेदार कोडी यांच्यासह हिपी तुम्हाला आपल्या आवडत्या मान्यवरांची एक झलक देखील दाखवते.

नॉन-स्टॉप मनोरंजनासाठी टॉप स्ट्रीमिंग आणि शॉर्ट व्हिडिओ अॅप्स नॉन-स्टॉप मनोरंजनासाठी टॉप स्ट्रीमिंग आणि शॉर्ट व्हिडिओ अॅप्स Reviewed by News1 Marathi on June 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads