Header AD

शेतकरी पुनर्वसन कायदा दि.बा.पाटील यांच्या मुळेच..वंचित बहुजन आघाडी तर्फे महाआघाडी सरकारचा जाहीर निषेध


 डोंबिवली ( शंकर जाधव ) लोकनेते दि.बा.पाटील यांनी संविधानिक पदे भूषविली आहेत.रायगड जिल्ह्याचे खासदार असताना या देशातील प्रकल्पग्रस्त शेतकरीशेतकरी मजूरआदिवासी स्त्रियाचा मुद्दा पोटतिडकिने आणि आंदोलन करून सोडविला आहे दि.बां.पाटीलांमुळेच राज्यात शेतकरी पुनर्वसन कायदा लागू झाला. 
           अशा त्यांच्या सामाजिक लौकिकपूर्ण कार्याचा विचार करता नवी मुंबई येथील विमानतळाला दि.बा.पाटील यांचा नांव लागेलच पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने जाहीर निषेध आंदोलनात केली. पूर्वेकडील महापालिका विभागीय कार्यालयाजवळील इंदिरा चौकात डोंबिवली वंचित बहुजन आघाडी तर्फे जाहीर निषेध आंदोलन छेडण्यात आले. 

          यावेळी राजू काकडेबाजीराव मानेमिलिंद साळवेसुरेंद्र ठोकेरोहित इंगळेशांताराम तेलंगबैजनाथ कांबळेतेजस कांबळे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मिलिंद साळवे म्हणालेदि.बा. पाटील यांचे कार्य मर्यादीत नाही वंचित बहुजन आघाडी संस्थापक अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांचीही विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नांव द्याव हीच भूमिका आहे.
         त्यांना साथ म्हणून डोंबिवली वंचित बहुजन आघाडीने महाआघाडी सरकारचामुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आणि हुकूमशाही भाषा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा आम्ही निषेध करतो. `निषेध असो निषेध असो आघाडी सरकारचा निषेध असो`,`एकनाथ शिंदे हाय हायएकनाथ शिंदे` अशा घोषणा इंदिरा चौकात वंचित कार्यकर्ते देत होते.

शेतकरी पुनर्वसन कायदा दि.बा.पाटील यांच्या मुळेच..वंचित बहुजन आघाडी तर्फे महाआघाडी सरकारचा जाहीर निषेध शेतकरी पुनर्वसन कायदा दि.बा.पाटील यांच्या मुळेच..वंचित बहुजन आघाडी तर्फे महाआघाडी सरकारचा जाहीर निषेध Reviewed by News1 Marathi on June 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads