Header AD

नवीन टीव्ही लॉन्च करण्यासाठी टीसीएल सज्ज


■या स्मार्ट मिनी एलईडी टीव्हीमध्ये अद्ययावत क्वांटम डॉट टेक्नॉलॉजीचा समावेश असेल ~


मुंबई, १६ जून २०२१ : टीसीएलने टेक-सॅव्ही भारतीयांसाठी इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीने बनवलेले अनेक स्मार्ट टीव्ही परवडण्याजोग्या किंमतीत यशस्वीरित्या लॉन्च केले आहेत. हेच मिशन पुढे घेऊन जात, हा ब्रॅंड आता एक अगदी नवीन स्मार्ट मिनी एलईडी टीव्ही लॉन्च करण्यास सिद्ध झाला आहे. १००% पेक्षा जास्त कलर व्हॉल्यूमसह यामध्ये या उद्योगातील अद्यतन अशी क्वांटम डॉट टेक्नॉलॉजी असल्याचा दावा करण्यात आला आहे. उच्च गुणवत्ता आणि इंटरॅक्टिव्ह होम एंटरटेन्मेंट अनुभवाच्या शोधात असलेल्या उपभोक्त्यांसाठी हा टीव्ही उत्तम असल्याची हमी देखील दिलेली आहे.            यामध्ये मॅजिकनेक्ट हे आणखी एक खास फीचर आहे, ज्याच्या मदतीने टीसीएल आपल्या यूझर्सना त्यांच्या स्मार्टफोनद्वारे अधिक सहजतेने टीव्ही संचालित करण्यास सक्षम करेल. या फीचरच्या मदतीने यूझर्स लाईव्ह टीव्हीचा स्क्रीनशॉट घेऊन शकतील, सोशल मीडियाच्या मार्फत कंटेन्ट शेअर करू शकतील, ऑडिओ/व्हिडिओ कास्ट करू शकतील आणि इतरही अनेक गोष्टी करू शकतील, तेही आपल्या मोबाइल फोनवरून. या ब्रॅंडच्या मते, हा नवीन टीव्ही स्मार्ट टीव्हीचा अनुभव नव्याने व्याख्यायित करेल आणि आपल्या यूझर्सना अधिक कनेक्टेड आणि स्मार्ट जीवनशैली जगण्यास सक्षम बनवेल.

नवीन टीव्ही लॉन्च करण्यासाठी टीसीएल सज्ज नवीन टीव्ही लॉन्च करण्यासाठी टीसीएल सज्ज Reviewed by News1 Marathi on June 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads