Header AD

अनाथ आश्रम मधील मुलांना स्नेहभोजन व वकृत्व स्पर्धा

 
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :-  कल्याण पूर्व चे आमदार   गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक आघाडी कल्याण पुर्वच्या वतीने टिटवाळा येथील जीवन संवर्धन अनाथ आश्रम व बेघर  मुलांना स्नेहभोजन देऊन त्याच्या समवेत आमदार  गणपत गायकवाड यांचा वाढदिवस साजरा  करण्यात आला.             तसेच मुलांबरोबर शिक्षक आघाडी, कल्याण पूर्वचे पदाधिकारी यांनी विविध कार्यक्रमाबरोबरच आमदारांनी शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील बच्चे कंपनी साठी आतापर्यंत केलेले विविध उपक्रम आणि कार्याची मुलांना माहिती दिली. त्यानंतर प्रश्नमंजुषा चा तास व वकृत्व स्पर्धा घेऊन त्यामधील अचूक उत्तर देणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य बक्षीस स्वरूपात देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.           या कार्यक्रमासाठी सुप्रिया नायकर- प्राचार्या ग्लोबल कॉलेज, या सुधाकर ठोके व लिपिका पाल- आयडियल स्कूल, श्रीकांत त्रिपाठी- नवजीवन हिंदी हायस्कूल,  अविनाश ओंबासे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. तर या कार्यक्रमासाठी अनिल एटम, अमित धांजी, मनोज माळी, विशाल जोगदंड, नितीन शिंदे व भारतीय जनता पार्टीचे कल्याण पूर्व सरचिटणीस  अरुण दिघे तसेच  जीवन संवर्धनचे (अनाथ बेघर मुलांचा सांभाळ करणारी संस्था) संस्थापक सदाशिव चव्हाण व तुकाराम चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अनाथ आश्रम मधील मुलांना स्नेहभोजन व वकृत्व स्पर्धा अनाथ आश्रम मधील मुलांना स्नेहभोजन व वकृत्व स्पर्धा Reviewed by News1 Marathi on June 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads