Header AD

निधी नसल्याने बिल्डरच्या सहकार्याने बनवला कॉंक्रीटचा रस्ता

 


■विजय दादा पाटील नगर फेज 3 च्या रस्ताचे नागरिकांच्या हस्ते लोकार्पण / नगरसेवक कुणल पाटील यांनी कोहिनुर बिल्डरच्या मदतीने सोडवली नागरिकांची समस्या...


 

कल्याण , कुणाल  म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगर पालिकाक्षेत्रात राजकीय राजवट संपून प्रशासकीय राजवट सुरु आहे. यामुळे अनेक प्रभागांमध्ये निधी अभावी विकासकामं रखडली आहेत. प्रभाग क्र. १०८ आडीवली ढोकळी येथील विजय दादा पाटील नगर फेज 3 परिसरात निधी नसल्याने बिल्डरच्या सहकार्याने सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता बनविण्यात आला असून नगरसेवक कुणल पाटील यांनी कोहिनुर बिल्डरच्या मदतीने नागरिकांची समस्या सोडवली आहे. या रस्ताचे नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.  


 

आडीवली ढोकळी प्रभागातील विजय दादा पाटील नगर फेज 3 या परिसरातील रस्त्याची दुरावस्था झाली होती.  येथील नागरिकांनी नगरसेवक कुणाल पाटील यांना पत्र देतभेटून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र केडीएमसीमध्ये प्रशासकीय राजवट लागू असल्याने आणि निधीची कमतरता असल्याने नागरिकांची ही रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी पाटील यांनी येथील कोहिनुर बिल्डर्सचे अमित होटचंदानी यांना हा रस्ता बनवून देण्याची मागणी केली होती.


 

नगरसेवक कुणाल पाटील यांच्या विंनतीला मान देत बिल्डर अमित होटचंदानी यांनी लागलीच याठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या  कामाला सुरुवात करत त्यांच्याहस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले होते. अखेर हा रस्ता पूर्ण झाला असूनआज नागरिकांच्या हस्ते या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.


 

नागरिकांच्या मदतीला धावलेल्या बिल्डर अमित होटचंदानी यांचे कुणाल पाटील यांनी आभार मानले असून नागरिकांना रस्ता उपलब्ध झाल्याने त्यांनी नगरसेवक कुणाल पाटील यांचे आभार मानले आहेत. 


निधी नसल्याने बिल्डरच्या सहकार्याने बनवला कॉंक्रीटचा रस्ता निधी नसल्याने बिल्डरच्या सहकार्याने बनवला कॉंक्रीटचा रस्ता  Reviewed by News1 Marathi on June 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads