Header AD

टीसीएल भारतातील व्हिडिओ गेमिंगला नव्याने परिभाषित करणार


आगामी काळात करणार 'सी-सीरीज' स्मार्ट टीव्ही लॉन्च ~


मुंबई, २० जून २०२१ : ग्लोबल टॉप २ टीव्ही कॉर्पोरेशन टीसीएलने नव्या काळातील ग्राहकांना किफायतशीर किंमतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नेत्रदीपक उत्पादनांची निर्मिती केली आहे. या मोहिमेवर असताना सी-सीरीज स्मार्ट टीव्हीत आणखी एक यशस्वी उत्पादन आणताना ब्रँडला अतिशय आनंद होत आहे.         नवे उत्पादन हे मोठा डिस्प्ले, सहज प्रोसेसिंग आणि शक्तीशाली इंजिनद्वारे व्हिडिओ गेमिंगला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी तयार करण्यात आले आहे.जेणेकरून यूझरला एक अत्यंत ऑप्टिमाइज्ड गेमिंगचा अनुभव येईल. यात 4 वे एचडीएमआय २.१ पोर्ट, वायफाय ६, व्हेरिएबल रिफ्रेश रेट, ऑटो लो लॅटन्सी मोड आणि एनहान्स्ड ऑडिओ रिटर्न चॅनेल यासारख्या आधुनिक गेमिंग सुविधा दिल्या जातील. यामुळे लो-इनपुट लॅग, वर्धित साउंड क्वालिटी, उच्च कनेक्टिव्हिटी स्पीडसह अखंड अॅक्शन गेमप्लेचा आनंद मिळेल.          गेमिंगचा अनुभव एक नव्या पातळीवर नेण्याचा ब्रँडचा प्रयत्न आहे. अधिक आनंददायी आणि अप्रतिम गेम मास्टर अनुभव प्रदान करण्याचा, तसेच प्रत्येक इमेज आणि सीन स्मूथ करण्यासाठी उच्च रीफ्रेश रेट डायनॅमिक कॉम्पेन्सेशनसह देण्याचा त्यांचा उद्देश आहे. या महिन्याच्या अखेरीस हे उत्पादन भारतीय बाजारात सादर करण्यात येईल.

टीसीएल भारतातील व्हिडिओ गेमिंगला नव्याने परिभाषित करणार टीसीएल भारतातील व्हिडिओ गेमिंगला नव्याने परिभाषित करणार Reviewed by News1 Marathi on June 20, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads