Header AD

सुशोभीकरण, स्वच्छता व खड्डे बुजविण्याच्या कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

                                                                                        

■शहरातील सुशोभीकरण, स्वच्छता व खड्डे बुजविण्याच्या पाहणी करताना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा सोबत उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रवींद्र खडताळे आदी....     
                     


ठाणे, प्रतिनिधी  ;  ठाणे महापालिकेच्यावतीने शहरात सुरु असलेल्या सुशोभीकरण, स्वच्छता व खड्डे बुजविण्याच्या कामाची आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली. महापालिका डॉ. विपिन शर्मा यांनी आनंदनगर चेक नाका, कॅडबरी जंक्शन, तीन हात नाका तसेच एलबीएस मार्ग येथील सुशोभीकरण, स्वच्छता व खड्डे बुजविण्याच्या कामाची पाहणी केली.        यावेळी पावसामुळे रस्त्याच्या बाजूला साचलेला कचरा, माती तसेच पडलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ उचलण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी संबंधित विभागास दिले. दरम्यान एलबीएस मार्गावरील रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी करून पावसाचे प्रमाण कमी झाले झाल्याने पेव्हरब्लॉक पद्धतीने तात्काळ रस्ता करण्याचे निर्देशही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले.


     

          यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रवींद्र खडताळे, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब चव्हाण, कार्यकारी अभियंता चेतन पटेल आदी उपस्थित होते.

सुशोभीकरण, स्वच्छता व खड्डे बुजविण्याच्या कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी सुशोभीकरण, स्वच्छता व खड्डे बुजविण्याच्या कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी Reviewed by News1 Marathi on June 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads