भिवंडी शहर महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी शिवसेना गटनेते संजय म्हात्रे यांची बिन विरोध निवड...

भिवंडी दि 5 (प्रतिनिधी ) भिवंडी महापालिकेचे शिवसेनेचे गटनेते संजय म्हात्रे यांची महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी बिनविरोधी  निवड करण्यात आली आहे, शिवसेनेचे नगरसेवक आणि गटनेते संजय म्हात्रे यांची डॅशिंग नगरसेवक म्हणून ओळख असून नागरिकांच्या समस्यासाठी नेहमी धाव घेत असून ते फक्त आपल्या प्रभागातील नव्हे तर शहरातील कोणताही नागरिक असुद्या त्यांच्या मदतीसाठी धाव घेत असल्याने त्यांची स्थायी समिती सभापती पदी  बिनविरोध निवड झाली आहे .पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशिर्वादामुळे आणि माजी आमदार रुपेश म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने तसेच शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांच्या सहकार्याने संजय म्हात्रे यांच्या हातात भिवंडी महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आल्या आहेत, भिवंडीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सैदव्य कार्यरत राहून भिवंडीच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हात्रे यांनी आश्वासन दिले असून यांची निवड   झाल्याने नागरिक त्यांचे अभिनंदन करत आहेत ..

Post a Comment

0 Comments