कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ८० हजारांचा टप्पा ८९८ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ८० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज ८९८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६८२   रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेत.      आजच्या या ८९८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ८०,०४० झाली आहे. यामध्ये ८८४५ रुग्ण उपचार घेत असून ६,९६७  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८९८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१४०कल्याण प – ३१७डोंबिवली पूर्व ८४डोंबिवली प – ११२मांडा टिटवाळा -३५, तर मोहना येथील १०रुग्णांचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments