बोले तैसा चाले..रक्त तुटवड्या वर मात करण्यासाठी डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी केले रक्तदान
ठाणे (प्रतिनिधी) -  सध्या महाराष्ट्रात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यावर मात करण्यासाठी रक्तदानाची नितांत गरज आहे.  त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री ना. डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी शुक्रवारी स्वतः देखील  रक्तदान केले. 


कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आलेली असतानाच आता रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण  झाला आहे.  सध्या पुढील आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे.  त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी  केले होते. आज या आवाहनापुरते मर्यादीत न राहता डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः रक्तदान करून आदर्श निर्माण केला आहे.  


ना. आव्हाड यांनी शुक्रवारी दुपारी खोपट येथील ब्लडलाईन रक्तपेढीमध्ये  जाऊन रक्तदान केले.यावेळी   ब्लडलाईन रक्तपेढीचे डाॅ. पाटील ...... उपस्थित होते. 


यावेळी ना. डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी, " राज्यातील रक्ततुवड्याची समस्या पाहता कोणी तरी रक्ताअभावी तडफडून मरतोय, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. त्यामुळे तरूण-तरुणींनी कोविडला न घाबरता फिजीकल डिस्टन्सिंगचा अवलंब करून रक्तदान करावे, तसेच कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी फिजीकल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा, मास्कचा वापर करावा, असे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments