लॉकडाऊन मुळे क्रीडा क्षेत्रावर पुन्हा संक्रात राज्यातील लाखो प्रशिक्षकांवर येणार उपास मारीची वेळ
कल्याण , कुणाल  म्हात्रे :  राज्यातील क्रीडा क्षेत्र आता कुठेतरी हळूहळू चालू होताना पाहायला मिळत होते. परंतु महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे आणि काही कडक निर्बंध यामुळे राज्यातील क्रीडा क्षेत्रावर पूर्णपणे संक्रांत येणार आहे.


गतवर्षी कोरोनामुळे बंद झालेले सर्व क्रीडाक्षेत्र या फेब्रुवारी- मार्च पासून हळूहळू सुरू होतानाचे चित्र दिसत होते. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही कडक निर्बंध आणि नियम लागू केले असून याचा फटका राज्यातील क्रीडा क्षेत्राला बसणार आहे. राज्यातील काही खेळ प्रशिक्षण वर्ग नुकतेच सुरू झाले होते. त्यांना आता शासनाचा पुढील निर्णयापर्यंत सर्व  प्रशिक्षण वर्ग बंद करण्याची वेळ आलेली आहे. यामुळे राज्यातील क्रीडा प्रशिक्षक यांच्यावर पुन्हा संकट येणार असून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न उभा राहणार आहे.


राज्यातील क्रिकेट फूटबॉल हॉकी कबड्डी खो-खो हॉलीबॉल व अन्य मैदानी खेळ तर स्केटिंग बास्केटबॉल चेस कॅरम कराटे व जलतरण या खेळावर संकट येणार असून योगा आणि जिम्नसियम अशा काही खेळाचा याला अपवाद असणार आहे. शासनाच्या पुढील निर्णयापर्यंत सर्व खेळ प्रशिक्षण वर्ग राज्यांमध्ये पूर्णपणे बंद राहणार आहेत. राज्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रसार आणि दुसऱ्या लाटेमध्ये बळी पडत असलेल्या संख्या आणि लागण होणारयांमध्ये लहान मुलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या सर्व गोष्टीवर कडक निर्बंध लादले गेले आहेत. यामुळे क्रीडा प्रशिक्षकांवर पुन्हा संक्रात येणार आहे.


 या क्रीडा शिक्षकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. तसेच क्रीडा प्रशिक्षकानी जसे जमेल तसे मार्ग काढून या संकटातून बाहेर यावे लागेल कोणीही हतबल किंवा निराश होऊन जास्त विचार करून आपली मानसिकता ढासळू देऊ नका.आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाची तसेच छोट्या खेळाडूंची आपल्यावर खूप मोठी भिस्त व विश्वास आहे. त्याला कुठेही तडा जाणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेऊन आपलं आरोग्य सुरक्षित ठेवायचे आहे असे आवाहन क्रीडा प्रशिक्षक अविनाश ओंबासे यांनी केले आहे. 


Post a Comment

0 Comments