Header AD

कल्याण मध्ये नियम तोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई

 

■तर नव्या निर्बंधांबाबत कल्याण डोंबिवलीतील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम दुकाने बंद ठेवण्याला व्यापाऱ्यांचा विरोध....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सोमवारी रात्रीपासून निर्बंध लागू करण्यात आले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. कल्याणमध्ये देखील सोमवारी रात्री ८ पासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज सकाळी काही ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने देखील सुरु होती. अशा दुकानांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.


वाढत्या कोवीड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशांनुसार कल्याण डोंबिवलीतही सोमवारी रात्रीपासून कठोर कोवीड निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र हे निर्बंध घालताना शासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारची सुस्पष्टता नसल्याने कल्याण डोंबिवलीतील व्यापारी वर्गात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये काही ठिकाणी दुकाने सुरू होती तर काही ठिकाणी बंद असल्याचे दिसून आले.


रविवारी संध्याकाळी वाढत्या कोवीड संख्येला आळा घालण्यासाठी राज्य शासनाकडून कठोर निर्बंध जाहीर करण्यात आले. त्यावेळी शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद (विकेंड लॉकडाऊन) आणि आठवड्याचे इतर दिवस निमनुसार दुकाने सुरू ठेवण्याचे राज्य शासनातर्फे तोंडी सांगण्यात आले. मात्र ज्यावेळी लेखी आदेश (जीआर) निघाले त्यांनी मात्र व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. अशातच केडीएमसी प्रशासनाकडूनही राज्य शासनाच्या आदेशानुसार मग सोमवारी रात्री नविन कोवीड निर्बंध जाहीर करण्यात आले.


त्यातही राज्य शासनाच्याच आदेशांची 'रीओढण्यात आल्याने कल्याण डोंबिवलीकरांच्या संभ्रमात आणखीनच भर पडली. 'आठवड्यातील सोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी तर शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगीअसा काहीसा व्यापारी आणि नागरिकांचा समज झाला होता. मात्र त्याची आणखी व्यवस्थित खातरजमा केली असता मंगळवारपासून केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांनाच उघडण्यास परवानगी देण्यात आल्याचे केडीएमसी प्रशासनाकडून सांगण्यात आले.


शासनाला जर अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद ठेवायची होती तर मग शासनाने तसे स्पष्ट आदेश का काढले नाहीत. एवढे गोल गोल फिरवून आदेश काढायची काय आवश्यकता होतीअसा संतप्त सवाल काही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.


दरम्यान या सर्व गोंधळाच्या परिस्थितीमूळे आज सकाळी कल्याण डोंबिवलीत अनेक ठिकाणी व्यापारी वर्ग आपल्या दुकानाबाहेर गोळा झाला होता. आपले दुकान उघडायचे की नाही या संभ्रमात तो दिसत होता. कल्याण पूर्वेत मात्र अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू ठेवत शासनाच्या या निर्णयाचा विरोध केला. कोरोना फक्त आमच्या दुकानातूनच पसरतो कादुकाने बंद केली तर आम्ही खायचे कायअसा संतप्त सवाल दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी केला आहे.  

कल्याण मध्ये नियम तोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई कल्याण मध्ये नियम तोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई Reviewed by News1 Marathi on April 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads