व्यसन मुक्ती साठी एम. के महाविद्यालयात ऑनलाईन वेबिनार संपन्न

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पश्चिमेतील मेंहिदर सिंग काबल सिंग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून  व्यसनमुक्तीसाठी ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले. या कार्यक्रमास सलाम मुंबई फाउंडेशनचे प्रतिनिधी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


मिलिंद पाटील यांनी मार्गदर्शनाची सुरूवात व्यसनमुक्तीची शपथ देऊन करण्यात आली. व्यसनांमुळे माणसास शारीरिकमानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. दारूगुटखातंबाखूसेगरटअमली पदार्थाचे सेवन व त्यांचे दुष्परिणाम या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. तंबाखूच्या सेवनाच्या चक्रव्यूहातून तरूण पिढीला बाहेर काढूननिकोटीन व तंबाखूच्या व्यसनापासून प्रतिबंध करणे. ही यावर्षीची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे.


 देशात प्रत्येक १६ सेकंदाला एक मूल तंबाखूचे पहिल्यांदा सेवन करतो तर दर दिवशी हा आकडा ५,५००  मुलांपर्यंत जातो. या व्यसनाच्या दुष्टचक्र यापासून अलिप्त ठेवण्यासाठी प्रत्येक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी मानसिकता निर्माण करणे,  तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचा समाजावर मोठा परिणाम होत आहे. अनेकांना कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी व्यसन केल्यास त्याचा परिणाम आरोग्यासह शिक्षणावरही होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.


यावेळी कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी पोस्टरव्हीडिओचित्रफीती व्दारे धुम्रपानाबद्दल जनजागृती करून व्यसनमुक्तीचे अवाहन केले. याप्रसंगी एम. के. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश माळीउपप्राचार्य डॉ. किरण वाटवानीराष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी प्रा. ओमकार काबाडीप्रा.अर्चना कुलकर्णीप्रा. तुषार के.,  राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी झाले. 

Post a Comment

0 Comments