कल्याण डोंबिवली करांना धोक्याची घंटा एकाच दिवशी ११०८ रुग्ण तर ३ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ८० हजारांचा टप्पा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली करांसाठी धोक्याची घंटा वाजली असून आज एकाच दिवशी एक हजारच्या वर रुग्ण सापडल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिका  क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ८१ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज तब्बल ११०८  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ७१५रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेत.      आजच्या या ११०८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ८१,१७९ झाली आहे. यामध्ये९२३५ रुग्ण उपचार घेत असून ७०,६८२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२६२जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ११०८रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१४६कल्याण प – ३६९डोंबिवली पूर्व ४०५डोंबिवली प – १४२मांडा टिटवाळा -३४, तर मोहना येथील १२ रुग्णांचा समावेश आहे.


Post a Comment

0 Comments