ठाण्यात आज पर्यंत १,५०,४१३ लाभार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण; लसीकरणाची व्याप्ती वाढली

 

■नागरिकांनी लसीकरणासाठी येण्याचे महापालिकेचे आवाहन...


ठाणे, प्रतिनिधी :  केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरात व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू असून आज अखेर १,५०,४१३ लाभार्थ्यांचे ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले असल्याची माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. दरम्यान शहरात लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले असून नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे. 


       कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व कोवक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार टप्या टप्प्याने देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. 

       

      या मोहिमेंतर्गत कोरोना बाधित रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना, फ्रंटलाईन वर्कर्स, ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे.

      

           आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर २०,६९२ आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहिला तर ११,१७७ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. खाजगी रुग्णालयानध्ये ९९ जणांना पहिला डोस तर १,६४० जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 


            फ्रंट लाइन कर्मचारी पैकी ठाणे महापालिकेच्या केंद्रात १७,३९५ लाभार्थ्यांना पहिला व ८,२६५ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला असून खाजगी रुग्णालयात ६४४  लाभार्थ्यांना पहिला व  १८ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 


             ४५ ते ६० वयोगटातंर्गत ठामपा केंद्रात ९,७८३ लाभार्थ्यांना पहिला तर ८६ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. याच वयोगटातंर्गत खाजगी रुग्णालयातील केंद्रामध्ये ५,६०४ लाभार्थ्यांना पहिला डोस व २ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.   

     

    ६० वर्षावरील नागरिकांमध्ये ठामपा केंद्रात ५३,१८१ लाभार्थ्यांना पहिला डोस व ४४२ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये या वयोगटातंर्गत २०,२५९ लाभार्थ्यांना पहिला डोस व २६ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 

    

      सदेय:स्थितीत ठाणे महानगरपालिकेच्यावतीने  लसीकरणाची ५४ सत्र सुरु आहेत त्यापैकी १७ सत्र हे निश्चित आहे व बाकीचे सत्र वैकल्पिक स्वरूपाची आहेत. ठाणे महानगरपालिकेची आरोग्य केंद्रे व अँटीजन चाचणी केंद्रे येथे असलेले लसीकरण निःशुल्क आहे तर खाजगी रुग्णालयांमध्ये असलेल्या लसीकरणासाठी २५० रूपये आकारण्यात येतात. तरी सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments