सुमन अग्रवाल पुन्हा अखिल भारतिय अग्रवाल संमेलनाच्या राष्ट्रिय सचिव पदी
ठाणे , प्रतिनिधी  : -  नावाजलेल्या समाजसेविका व वुमंस राईट्स एक्टिव्हीस्ट सौ. सुमन अग्रवाल यांची अखिल भारतिय अग्रवाल संमेलन या संस्थेच्या राष्ट्रिय सचिवपदी एकदा पुन्हा नेमणूक करण्यात आली आहे. सौ. अग्रवाल यांचीा ही नेमणूक संस्थेच्या बैठकीत नव्या राष्ट्रिय कार्यकारिणीसाठी झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीदरम्यान राष्ट्रिय अध्यक्ष गोपालशरण गर्ग यांनी केली, नियुक्तीपत्रात अशी माहिती देत संस्थेचे राष्ट्रिय सरचिटणीस विनोद अग्रवाल नमूद केले आहे की सुमन अग्रवाल यांची ही नेमणूक 2021 ते 2024 या सालांसाठी करण्यात येत आहे व त्यासाठी समाज व संघटनेसाठी त्यांचे असलेल्याा त्याग, निष्ठा, समर्पण व ठाम अनुभवास ग्राह्य धरण्यात आलेले आहे. याचप्रसंगी संस्थेच्या नव्या कार्यकारिणीत राजेंद्र अग्रवाल यांची राष्ट्रिय उपाध्यक्षपदी नेमणूकही करण्यात आली.  


         सौ. अग्रवाल यांची संस्थेच्या राष्ट्रिय सचिवपदी पुन्हा नेमणूक झाल्याने मुंबई, ठाणे, पुणे व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांसह संपूर्ण देशातल्या समाज व संघटनेच्या लोकांमध्ये अत्यंत हर्षाचे वातावरण आहे, म्हणूनच सौ. अग्रवाल यांच्यावर सध्या देशभरातून शुभेच्छेंचे-अभिनंदनांचे वर्षाव होत आहे. आपल्यावर ज्याप्रकारे भक्कम विश्वास दाखवून नव्याने पुन्हा एकदा तीच जबाबदारी अत्याधिक कौशल्यतेने पार पारण्याची सुवर्णसंधी देण्यात आली असून त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष गोपालशरण गर्ग यांच्यासह सर्व ज्येष्ठ पदाधिका-यांचे सुमन अग्रवाल यांनी आभार मांडले व या जबाबदारीस पुर्णत्व प्रदान करण्यासाठी मी समाज व संघटनेच्या चतुर्दिक प्रगतीकरिता स्वतःला झुगारून घेऊन सातत्याने सक्रीयपणे प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही सुमन अग्रवाल यांनी सदर नियुक्तीच्या अनुषंगाने दिली आहे. 

Post a Comment

0 Comments