शेतघर जळाल्याने शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणीभिवंडी  दि.२(प्रतिनिधी  ) भिवंडी तालुक्यातील पडघा वडवली येथील शेतकरी रविंद्र दुंदाराम वारघडे यांचे शेतावर असलेले शेतघर पाच दिवसांपूर्वी शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून जलल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने दुर्घटनेवेळी या घरात कोणी नसल्यामुळे जिवीत हानी टळली. मात्र या शेतघरात शेतीसाठी आवश्यक असणारी उपकरणे व एक पाण्याची मोटर जाळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठ्ये नुकसान झाले आहे . विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रवींद्र वारघडे हे टोरंट पावर कंपनीकडे नवीन मिटर कनेक्शन मिळावे यासाठी  मात्र त्यांच्या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नसल्याने अखेर शॉर्ट सर्किटने आग लागून शेतघर जळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून शेतघर व शेतीचे साहित्य जळाल्याने शेतात लावलेली पिके देखील करपून गेली आहेत . या घर जाळल्याची व पिके कारपल्याचा मानसिक धक्का वारघडे यांना बसला असल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना टोरंट पावर कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी वडवली गावच्या सरपंच करुणा संजय वारघडे यांनी केली आहे. विशेष म्हणजे मागील पाच दिवस वारंवार फेऱ्या मारल्या नंतर शुक्रवारी दुपारी टोरंट कंपनीचे कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असल्याची माहिती शिवसेना संपर्क प्रमुख संजय वारघडे यांनी दिली आहे .

Post a Comment

0 Comments