हिराली फाउंडेशन तर्फे आरएसपी अधिकारी युनिटचा "शांतीदूत" पुरस्काराने सन्मान
कल्याण , कुणाल म्हात्रे  : नो हॉर्न डे या उपक्रमाअंतर्गत नेताजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज उल्हासनगर येथे हिराली फाउंडेशनच्या वतीने आरएसपी अधिकारी युनिट कमांडर मनिलाल शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनासारख्या  आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन आणि पोलिस विभाग यांनी जीवाची पर्वा न करता खांद्याला खांदा लावून सेवा देणारे आरएसपी अधिकारी शिक्षक युनिटचा हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खनचंदानी याच्या वतीने, सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी प्राचार्या रेखा ठाकूर यांच्या हस्ते संपूर्ण आरएसपी अधिकारी युनिटचा  "शांतीदूत" म्हणुन सन्मान करण्यात आला.


 यावेळी उल्हानगरचे समादेशक सुधीर वराडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. राजेंद्र गोसावी यांनी आपत्कालीन परिस्थितीत मणिलाल शिंपी यांच्या नेतृत्वामुळे कल्याण डोंबिवली युनिटला विशेष कार्य करण्याची संधी मिळाली. आम्हाला  मिळणारा सन्मान हा आमच्या कमांडर सरांच्या कार्यतत्परतेचा गौरव आहे असे सांगितले.


हिराली फाऊंडेशनच्या संस्थापिका सरिता खनचंदानी यांनी आरएसपी अधिकारी यांनी केलेले कार्य खूप उल्लेखनीय आहेमी माझ्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याच्या कालावधीत पहिल्यांदा आर एस पी शिक्षक समाजासाठी मोलाची कामगिरी करू शकतात ते पहिल्यांदा पाहिले. आरएसपीचे प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र राज्याचे महासमादेशक अरविंद देशमुख यांच्या कर्तुत्वालाहिराली फाउंडेशनच्या मुजरा या शब्दात गौरव केला. 

Post a Comment

0 Comments