उल्हास नदी जतन व संवर्धना साठी नदीत सोडले ग्रास कार्प व सिल्वर कार्प जातीचे २० हजार मासे
कल्याण , कुणाल  म्हात्रे   : उल्हासनदीला पडलेल्या जलपर्णीच्या विळख्या मुळे नदीतील जीवसृष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर असून यामुळे सर्वच सामाजिक घटक चिंतीत झाले आहेत. जलपर्णीला इंग्रजीत किलर विड असे म्हटले जाते. कारण हि वनस्पती वाढत असताना त्या खालील जलत्रोतांना मृत केल्याचे जगामध्ये अनेक उदाहरणे आहेत. हे जलस्रोत सशक्त ठेऊन जलपर्णी नष्ट करण्यासाठी सर्वसमावेशक मार्ग अजूनही उपलब्ध नाहीत. यासाठी सगुणा रूरल फाउंडेशन नेरळ या संस्थेने या वनस्पतीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी ग्रास कार्प व सिल्वर कार्प जातीचे २० हजार मासे नदीत सोडले आहेत.


       उल्हासनदीचा हा प्रश्न सोडवण्यासाठी या प्रयोगात्मक योजने अंतर्गत मे २०२१ च्या आत या जलपर्णीरूपी भयानक संकटावर प्रभुत्व्य मिळवण्यासाठी वेगवेगळे सर्वसमावेशक प्रयत्न करून सगुणा रूरल फाउंडेशनला हे काम सोपवण्यात आले आहे. या कार्यक्रमा अंतर्गत रविवारी २० हजार मत्स्यबीज बोटुकली रायते बंधारा येथे उल्हास नदी मध्ये सोडण्यात आले. या मध्ये गवत्या मासा (ग्रास कार्प)  आणि चन्देरी मासा (सिल्वर कार्प)  या दोन प्रजातीचे मासे सोडण्यात आले. हे दोन्ही मासे ९ ते १० महिन्यात १ किलो व २ वर्षात २ ते ३ किलो व तद नंतर त्यापेक्षाही मोठया आकाराचे होतात. या दोन्ही  हि प्रजाती आपल्या नदी मध्ये निसर्गतः आढळत नाहीततसेच दोन्ही हि जाती मासेमारीसाठी अतिशय चांगल्या समजल्या जातात


. गंगा व तिच्या उपनद्यांमध्ये या दोन्ही प्रजाती निसर्गतः उपलब्ध आहेत. गवत्या माश्याच्या तोंडाची रचना अशी आहे कि ते पाण्यातील जिवंत वनस्पती मोठया प्रमाणामध्ये आवडीने खाऊन संपवतात. तसेच चन्देरी मासे त्यांच्या तोंडाच्या रचनेप्रमाने तरंगते शैवाल खाऊन संपवून टाकतात. अश्या प्रकारे दोन्ही हि प्रजाती नदीच्या पाण्याच्या शुद्धीकरणामध्ये फार मोलाचा सहभाग देणे अपेक्षित आहे. या मत्स्यबीज बोटुकली सोडून केलेल्या सुरवात करण्यामध्ये हा अभ्यास करणे तसेच उल्हास माईच्या शुद्दीकरण व सौंदर्यीकरण या कामे सर्व घटकांना अवगत करणे व सामावून घेणे हा विचार होता. असे एसआरएफचे कृषिरत्न (कृषी,मत्सशेती व पर्यावरण तज्ञ्) चंद्रशेखर भडसावळे यांनी सांगितले.


                या दोन जातीचे मत्स्यबीज एकूण २० हजारहून अधिकनग कलकत्त्याहून विमानाने मुंबई पर्यंत येऊन रविवारी पहाटे रायते ब्रीज येथे पोहोचले. या अभियानात लहानग्या पासुन मोठ्या पर्यंतविविध समाजसेवी संस्था यांनी सहभाग दर्शविला. यामध्ये कृषिरत्न चंद्रशेखर भडसावलेकल्याण तालुका तहसीलदार दिपक आकडेसहकाऱयांसोबत सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक नितिन निकमउल्हास नदी बचाव कृती समितीचे अश्विन भोईररविंद्र लिंगायतविवेक गंभीरराव, निकेश पावशे व वालधुनी बिरादरीचे शशिकांत दायमाउल्हास नदीच्या दोन्ही बाजूच्या ग्रामपंचायत सदस्य व म्हारळवरपकांबाचे बरेच नवनिर्वाचित सदस्यद वॉटर फाउंडेशनचे पंकज गुरव व कुमार रेडियीन, तसेच अश्वमेध प्रतिष्ठान चे अविनाश हरडतुषार पवारदत्ता बोंबे आदि पर्यावरणप्रेमीऊमाई पुत्र या अभियानात सामील झाले.


       उल्हास नदीचे वाढते प्रदूषण व त्यावरील उपाययोजना यावर कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळेसगुणा बाग नेरळ यांनी प्रमुख मार्गदर्शन केले तसेच प्रशासकीय पातळीवर उल्हास नदी बचावासाठी शक्य अश्या सर्व उपाययोजना व मदत केली जाइल अशी ग्वाही कल्याण तालुका तहसीलदार दिपक आकडे यानी दिली. मासे म्हटले कीफक्त खाण्यासाठी उपयोगात येत नसून ते पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी ही उपयोगी असतात असे नमूद करतांना  मासे नदीत सोडत लहानग्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments