लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखलकल्याण , कुणाल म्हात्रे  : डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव येथे लग्न समारंभात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून कठोर पावले उचलणे बाबतचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागक्षेत्र अधिकारी यांना दिले आहेत. सध्या लग्न सराईचे दिवस असल्यामुळे आणि लग्न समारंभामध्ये होणा-या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असल्यामुळे नियमांचे उल्लंघन करण्या-या मंगल कार्यालयलॉन्स सील करण्या बाबतच्या सूचनाही त्यांनी प्रभागक्षेत्र आधिका-यांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे गर्दी टाळणेबाबतनियमांचे काटेकोर पालन करणेबाबत आवाहन महापालिकेमार्फत वारंवार केले जात आहे.


 असे असतांनाही काल रात्री डोंबिवली पुर्वयेथील कोळेगांव सेंटमेरी स्कुल जवळ या ठिकाणी मोकळया जागेत एका विवाह समारंभात १०० ते १५० लोकांनी एकत्र येऊन गर्दी केल्याची माहिती प्राप्त होताच ई प्रभागक्षेत्र आधिकारी भारत पवार यांनी पोलिस आधिकारी वणवे व प्रभागातील कर्मचारी पथकासमवेत संबंधित स्थळी जावून पाहणी केली असता या विवाह समारंभात नियमांचे उल्लंघन करुन सुमारे १०० ते  १५० लोक उपस्थित असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे त्यांनी थर्मल स्क्रिंनिगचा वापर न करणेतोंडाला मास्क न लावणेसोशल डिस्टन्ससिंगचे पालन न करणे अशा प्रकारचे बेजबाबदार पणाचे वर्तन करुन कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.


त्यामुळे या विवाह सोहळयाचे आयोजक नामदेव सखाराम पाटीलरा.नांदिवली व शंकर जोशीरा.चिंचपाडा यांच्या विरुध्द भा.द.वि कलम 188,269,270 सह महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 सहआपत्ती व्यवस्थापन अधिनियमांचे कलम 51(बी) सह साथरोग प्रतिबंधक अधिनियम1857 चे कलम 2,3,4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी वारंवार हात धुणेसार्वजिनक ठिकाणी वावरतांना न चुकता मास्कचा वापर करणेसामाजिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावाअसे आवाहन महापलिकेमार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments