मराठी पाउल पडती पुढे; तरुण महिलेचा व्यवसाय क्षेत्रात पदार्पण
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. हेच प्रमाण काही अंशी कमी करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन कल्याणच्या परसिस योगेश विसावे या तरुण महिलेने नोकरी सोडून व्यवसाय जगतात पदार्पण केले आहे.


अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होत असते याचा अभ्यास करून एका मल्टिनॅशनल कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर असणाऱ्या परसिस विसावे यांनी नोकरी सोडून व्यवसायात पाउल ठेवले आहे, जिथे मराठी माणूस व्यवसाय करायला थोडा कचरतो तिथे महिलांनी पुढाकार घेणे ही बाब स्तुत्य आहे. 


परसिस विसावे यांनी प्रत्येकाला  चहाचा  असलेला चसका, आवड, तलब  लक्षात घेऊन  चहा प्रेमींसाठी कल्याण पश्चिम रामबाग येथे कृष्णाई अमृततुल्य  या चहाच्या दुकानाचे उदघाटन नुकतेच केले आहे. परसिस विसावे यांना या कार्यात योगेश विसावे व सुशील विसावे व कुटुंबीयांची चांगली साथ लाभली असे त्यांनी सांगितले. उदघाटन प्रसंगी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य व मित्र परिवार उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments