कोरोना काळातही केडीएमसीची मालमत्ता कराची विक्रमी वसूली आर्थिक वर्षात सर्वाधिक ४२७ कोटींचे उत्पन्न प्राप्त
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोना महामारी काळात देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने मालमत्ता कराची विक्रमी वसुली केली असून पालिकेला आर्थिक वर्षात आतपर्यंतचे सर्वाधिक तब्बल ४२७ कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. मालमत्ता कर संकलन विभागाने ३१ मार्च रोजी एका ‍दिवसात तब्बल रु. १०.७८  कोटींची वसूली केली आहे.


कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने १५ ऑक्टोबर २०२० ते १५ जानेवारी २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीकरीता ७५ टक्के व्याज माफीची अभय योजना लागू केली होती. त्यास करदात्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देवून या कालावधीत २३०.८५ कोटी कर भरणा केला. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रकीय उद्दीष्ट ४२५ कोटी रुपये असताना मालमत्ता कर संकलन विभागाने एकूण ४२७.५० कोटी रुपये वसूल केले असून ही महापालिकेच्या इतिहासातील मालमत्ता कराची सर्वात जास्त विक्रमी वसूली आहेजी गेल्या वर्षापेक्षा तब्बल १३४.४१ कोटी रुपयांनी जास्त आहे.


कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेकरीता महापालिकेचा बहुतांश कर्मचारी वर्ग गुंतलेला असताना महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त सुनिल पवारउपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कर ‍निर्धारक व संकलक विनय कुळकर्णी व त्यांचा अधिनस्त कर्मचा-यांनीउपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर अथक परिश्रमाअंती विक्रमी वसूली केली.


याकरीता महापालिकेने गत वर्षाच्या प्रारंभापासूनच विविध उपाय योजना अंमलात आणल्या असून त्यात विहीत वेळेत ‍बिले जनरेट करून पोहच करणेकराचा भरणा ऑनलाईन करणेकरीता जनजागृती करणेत्याकरीता डेबिट कार्ड/क्रेडीट कार्ड/ युपीआय/ बीबीपीएस/गुगल पे/फोन पे/भिम युपीआय/पॉस मशिन /नेट बँकीग इ.द्वारे ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देणेतसेच वाणिज्य ‍आस्थापना‍निवासी सदनिका व ओपन लँड विकासक यांना जप्ती पुर्वीच्या नोटीसा देणे व वाणिज्य आस्थापना सिल करणे आदींचा अंतर्भाव आहे.


महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक व त्यांच्या कर्मचारी वर्गाने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व शहर अभियंता/जल अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी देयकांच्या वसूली पोटी ६६.९४ कोटीची वसूली केली आहे . ही वसूली देखील महापालिकेच्या इतिहासातील विक्रमी वसूली असून गेल्यावर्षी ही वसूली ६१.१० कोटी इतकी होती.


कोविड साथीच्या या कठीण परिस्थितीतही महापालिकेच्या करदात्यांनी करांचा भरणा करुन महापालिकेस केलेल्या सहकार्याबाबत महापालिका करदात्या नागरिकांची आभारी असून  सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातही करदात्यांनी वर्षाच्या प्रारंभापासूनच शक्यतो ऑनलाईनद्वारे कराचा भरणा करून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments