राजस्थान रॉयल्सच्या नवीन आयपीएल २०२१ जर्सीचे त्यांच्या होम स्टेडियमवर भव्य अनावरण

 

आपल्या होम स्टेडियम बाहेरून आणखी एक हंगाम खेळण्यासाठी राजस्थान रॉयल्स सज्ज..


भारत, ५ एप्रिल २०२१ : राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेटपटूंना त्यांच्या परिचित पीचवर खेळण्याचा आणि होम ग्राउंडवरील चाहत्यांच्या पाठिंब्याचा आनंद लाभणार नसला, तरीही सहा हंगाम तेवढाच रोमांचक होईल याची निश्चिती त्यांनी रेड बुल इंडियाच्या सहयोगाने सवाई मानसिंग स्टेडियमवर केलेल्या २०२१ हंगामाच्या जर्सी अनावरण सोहळ्याद्वारे केली.


३ एप्रिल २०२१च्या रात्री सवाई मानसिंग स्टेडियम नेत्रदीपक थ्रीडी प्रोजेक्शन आणि लाइट शोमध्ये उजळून गेले. जगभरातील चाहत्यांसाठी आणि मुंबईत बायोबबलमध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंसाठी एका ऑडिओ-व्हिज्युअल शोकेसचे थेट प्रक्षेपण येथून करण्यात आले. 


स्टेडियम, जयपूर शहर, राजस्थानी संस्कृती आणि निसर्गाचा पट अशा राजस्थान रॉयल्स संघाच्या चाहत्यांच्या हृदयात घर केलेल्या प्रत्येक घटकाचे साजरीकरण या शोकेसद्वारे करण्यात आले. त्याचप्रमाणे या फ्रँचायझीने रेड बुलशी केलेल्या सहयोगामुळे त्यांना वेगाने पुढे जाण्यात, नवीन कल्पना आणण्यात आणि संघाचा विकास साधण्यात कशी मदत होत आहे याचे प्रतिबिंबही यात दिसले.


सवाई मानसिंग स्टेडियमध्‍ये खेळपट्टीपासून प्रेक्षकांच्‍या स्‍टॅण्‍ड्सपर्यंत प्रत्‍येक भाग रोषणाईने प्रकाशित करत शोला सुरूवात झाली. यानंतर विशेषत: लाइव्‍ह शोसाठी उभारण्‍यात आलेल्‍या मोठ्या स्क्रिनवर स्‍टेडियम, शहर व राजस्‍थानमधील नयनरम्‍य स्‍थळांना दाखवणारा एक व्हिडिओ मोंताज दाखवण्‍यात आला. तसेच रेड बुल वाहने व इव्‍हेण्‍ट्सचे हाय-स्‍पीड अॅक्‍शन शॉट्स देखील दाखवण्‍यात आले. 


या शोचा भाग म्‍हणून रॉयल्‍स संघातील क्रिकेटपटूंचे स्टेडियमवरील स्क्रीनवर 3डी प्रोजेक्शन करण्यात आले आणि या क्रिकेटपटूंनी नवीन हंगामात वापरल्या जाणाऱ्या जर्सीचे अनावरण करत चाहत्यांना २०२१ मध्ये घातल्या जाणाऱ्या गुलाबी व निळ्या जर्सीचे पहिलेवहिले दर्शन घडवले. हा शो म्हणजे राजस्थान रॉयल्स संघाच्या चाहत्यांना केलेले वंदन होते. हे चाहते या हंगामातील सामन्यांमध्ये स्टेडियमवर उपस्थित राहून पाठिंब्याच्या डरकाळ्या फोडू शकणार नाहीत पण जेव्हा-जेव्हा चाहत्यांना आनंद देणारा चौकार ठोकला जाईल किंवा महत्त्वाची विकेट घेतली जाईल, तेव्हा-तेव्हा चाहत्यांचे आनंदी चित्कार क्रिकेटपटूंच्या कानात घुमतील हे नक्की.


राजस्थान रॉयल्स संघातील ऑल-राउंडर व रेड बुल अॅथलीट रियान पराग सवाई मानसिंग स्टेडियमवरील अनोखा आयपीएल २०२१ जर्सी अनावरण सोहळा बघण्याच्या अनुभवाबद्दल म्हणाला, “गेल्या वर्षी रेड बुल अॅथलीट दानी रोमानने दुबईतील बीचसाइड हॉटेलमध्ये हवाई मार्गाने उतरून आयपीएल २०२०च्या उत्कृष्ट जर्सीजचे अनावरण केले होते व आम्हाला त्या सुपूर्द केल्या होत्या. यामुळे राजस्थान रॉयल्सचे क्रिकेटपटू अचंबित झाले होते. यावर्षी आणखी एक भव्य अनावरण सोहळा झाला. याचीही संकल्पना रेड बुलचीच होती. या हंगामात आमच्या चाहत्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”


दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर ख्रिस मॉरिस नवीन जर्सी अनावरणाबद्दल म्हणाला,  “नवीन जर्सीच्या अनावरणाचा हा अविश्वसनीय सोहळा होता. मी मागे रॉयल्ससाठी खेळलो होतो त्या काळाच्या तुलनेत म्हणजे २०१५ पासून गेल्या वर्षीपर्यंत जर्सीमध्ये खूप बदल झाले आहेत आणि ही जर्सी फारच सुंदर आहे. पुन्हा एकदा संघाचा भाग होणे माझ्यासाठी रोमांचक अनुभव आहे आणि या डिझाइनची मुख्य प्रेरणा संघाचा भक्कम पाया आहे ही अभिमानास्पद बाब आहे.”


या अनोख्या जर्सीचे अनावरण प्रत्यक्षात आणण्यात क्रिएटिव फॅक्टरीने मदत केली. संस्थापक आणि क्रिएटिव डायरेक्टर विभोर खंडेलवाल म्हणाले, “राजस्थान रॉयल्सची नवीन जर्सी सर्वांसमोर आणण्याच्या सोहळ्याच्या प्रोजेक्ट मॅपिंग कंटेण्टचे डिझाइन व कार्यान्वयन करण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल मी रेड बुल इंडियाच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. हा सोहळा केवळ सृजनशील दृष्टिकोनातून वेगळा नव्हता, तर तो प्रत्यक्षात आणण्यासाठीही थोडा वेळ द्यावा लागला. केवळ १० दिवसांत आम्ही आमचा नवीनतम तंत्रज्ञान उपयोगात आणण्याचा संपूर्ण अनुभव आणि रेड बुल इंडिया व क्रिएटिव फॅक्टरी या दोन्ही टीम्सची सृजनशील विचारशक्ती वापरून हे सगळे घडवून आणले.”


रॉयल्स आणि त्यांच्या चाहत्यांनी कायमच आपल्यातील समान धागे व रंग जपले आहेत आणि हे लक्षात घेऊन टीमने एक आकर्षक व सामाजिक अधिष्ठान असलेली जर्सी आगामी हंगामासाठी लाँच केली आहे. क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याच्या रॉयल्सच्या ध्येयाचे प्रतीक ठरतील असे चार अनोखे व विशेष घटक यात आहेत. राजस्थान रॉयल्स फाउंडेशनच्या माध्यमातून टीम सबल स्त्रियांसोबत करत असलेल्या कामाला आणि राजस्थान या होम स्टेटमधील लक्षावधी स्त्रियांच्या आयुष्यांवर करत असलेल्या प्रभावाला ही जर्सी समर्पित आहे. 


भूजलस्तर वाढवण्यासाठी १४,००० ‘खेजरी’ झाडे लावणे असो, स्त्रियांचे रजया विणण्याचे कौशल्य व सृजनशीलता जोपासणे आणि त्याचा विकास करणे असो, मानसिक आरोग्य किंवा मासिकपाळीसारख्या फार चर्चिल्या न जाणाऱ्या समस्यांना तोंड देणाऱ्या स्त्रियांना मदत करणे असो किंवा स्त्रीमधील खऱ्या अर्थाने सिंहीण होण्याची क्षमता उपयोगात आणण्यासाठी केलेले काम असो, हे सर्व विशेष घटक या जर्सीमध्ये काळजीपूर्वक सामावले गेले आहेत. याचा अर्थ रॉयल्ससाठी जर्सी हा केवळ एक विणलेले वस्त्र नाही, तर समोर कोणतेही आव्हान असले तरी त्याचा सामना करण्याचे सामर्थ्य ती घालणाऱ्याला देणार आहे. हे धागे हंगामभर परिधान करणे रॉयल्ससाठी केवळ आनंदाचे नाही, तर अत्यंत अभिमानाचे आहे.


या अनोख्या जर्सीचा अनावरण सोहळा बघण्यासाठी भेट द्या- www.redbull.in/rrjersey

Post a Comment

0 Comments