Header AD

कल्याण डोंबिवली मध्ये रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा?

 

■रेमडीसीविर इंजेक्शन घेण्यासाठी कल्याण पूर्वेत लोकांची मोठी गर्दी....


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या रेमडीसीविर इंजेक्शनचा कल्याण डोंबिवलीमध्ये मोठा तुटवडा  असल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. कल्याण पूर्वेतील सूचक नाका येथील खाजगी रुग्णालयाच्या मेडीकलबाहेर हे इंजेक्शन घेण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.


कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे शहरातील खासगी रुग्णालये आणि जम्बो कोवीड सेंटर्सही रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. कोरोना रुग्णांसाठी रेमडीसीविर हे औषध अत्यंत परिणामकारक ठरत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच कोवीड रुग्णसंख्या चिंताजनकरित्या वाढल्याने साहजिकच या इंजेक्शनची मागणीही प्रचंड वाढली आहे. त्यामुळे ज्याठिकाणी हे इंजेक्शन मिळते त्या मेडीकल दुकानात लोकांच्या अक्षरशः मोठाल्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. कल्याण पूर्वेतील अमेय फार्मसी या मेडीकलमध्ये हे इंजेक्शन घेण्यासाठी केवळ कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातूनच नव्हे तर थेट मुंबईवरूनही लोकांनी गर्दी केली होती.  


यातील काही जण तर सतत 3 दिवसांपासून हे इंजेक्शन घेण्यासाठी येऊन रांगेत उभे राहत आहेत. तर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झालं असून गर्दीचे नियोजन करत आहेत.  त्यामूळे कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे की कायअसा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

कल्याण डोंबिवली मध्ये रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा? कल्याण डोंबिवली मध्ये रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा? Reviewed by News1 Marathi on April 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads