बाबा गुरबचन सिंह मेमो रियल क्रिकेट टुर्ना मेंटचा शुभारंभ मुंबई - महाराष्ट्रातून दोन टीमचा समावेश


■संत निरंकारी आध्यात्मिक स्थ समालखा येथे आयोजन....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  बाबा गुरबचनसिंह मेमोरियल २१ व्या क्रिकेट टुर्नामेंटचाशुभारंभसंत निरंकारी आध्यात्मिक स्थ समालखा मैदान येथे शुक्रवारी करण्यात आला. त्यामध्ये मुंबई-महाराष्ट्रातील दोन टीमचा समावेश आहे.

       यावर्षी या क्रिकेट टुर्नामेंटचा मुख्य विषय स्थिर मनसहज जीवन’ असा असून ही क्रिकेट टुर्नामेंट २  एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत होणार आहे. या प्रतियोगितेमध्ये देशाच्या अनेक राज्यांतूनजसे- दिल्लीमहाराष्ट्र, हरियाणापंजाबउत्तर प्रदेशराजस्थानकर्नाटकउत्तराखंडगुजरातजम्मू कश्मीरमध्य प्रदेश इत्यादि राज्यांतून आलेल्या युवकांनी नोंदणी केली असून त्यापैकी ४८ टीमची निवड करण्यात आली आहे. या क्रिकेट टूर्नामेंटबद्दल त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.


      क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंची कोविड चाचणी करण्यात आली आहे. याशिवाय कोविड-१९ च्या संदर्भात सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे या टूर्नामेंटमध्ये पालन केले जात आहे. या क्रिकेट टुर्नामेंटची सुरवातबाबा हरदेवसिंहजी यांनी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ केली होती. बाबा गुरबचनसिंहजी यांनी तरुणांच्या उर्जेला नवाआयाम देण्यासाठी त्यांना सदैव खेळांच्या प्रति प्रेरित केले आणि त्यांच्या उर्जेला उपयुक्त दिशा दिली ज्यायोगे देश व समाजाची सुंदर निर्मिती व समुचित विकास केला जाऊ शकेल.


      समालखा येथे आयोजित केलेल्या या क्रिकेट टुर्नामेंटच्या शुभारंभ प्रसंगी संत निरंकारी मंडळाचे पदाधिकारीमंडळाच्या केंद्रीय योजना व सल्लागार बोर्डाचे सदस्य आणि कार्यकारिणी समितीचे सदस्य सहभागी झाले होते. संत निरंकारी मंडळाचे प्रधानआदरणीय भाईया गोबिंदसिंह यांनी ध्वजारोहण करुन या टूर्नामेंटचे उद्घाटन केले. या प्रसंगी आदरणीय सुखदेवसिंहचेअरमन,केन्द्रीय योजना व सलाहकार बोर्ड यांनी शांतीचे प्रतीक स्वरुप फुगे आकाशात सोडले.


वर्तमान समयाला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजनवऊर्जेसह वेळोवेळी विविध खेळांचे आयोजन करुन युवावर्गाला प्रोत्साहित करत आहेत. त्यामध्ये निरंकारी यूथ सिंपोझियम  आणिनिरंकारी सेवादल सिंपोझियम यांसारख्या उपक्रमांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. याद्वारे त्या सदोदित शाररिक व्यायामआणि खेळांच्या प्रति प्रोत्साहित करत आल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments