क्रीडा क्षेत्राबाबत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व क्रीडामंत्री यांना देणार निवेदन

■महाराष्ट्र राज्य क्रीडा संघर्ष समितीचा सर्वसाधारण सभेत निर्णय....


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  महाराष्ट्र राज्य क्रीडा संघर्ष समितीसंघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या परवानगीने व  कोविड १९ चे सर्व नियमांचं पालन करत अभिनव विद्यामंदिर कल्याण येथे नुकतीच संपन्न झाली. या सभेसाठी राज्यातून संघटनेचे पदाधिकारीजिल्हा अध्यक्षसचिव उपस्थित होते.


 या सभेमध्ये राज्यांत क्रीडा क्षेत्रात सुरू असणारा गोंधळ या संदर्भात विविध मुद्द्यावर चर्चा करून आगामी काळात मुख्यमंत्रीशिक्षणमंत्री क्रीडामंत्री व जिल्हा अधिकारी यांना  राज्यातील क्रीडा समस्या बाबत संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच येणाऱ्या काळामध्ये संघटनेची रचनात्मक व जिल्हास्तरीय बांधणी करून तालुका आणि गाव पातळीपर्यंत संघटना पोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सभेचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी सांगितले.


कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय  क्रीडा, शैक्षणिक धोरण ठरविणे. याबाबत चर्चा करून आगामी काळात कोरोनामुळे क्रीडा क्षेत्राचे होणारे नुकसान आणि क्रीडा स्पर्धा आयोजन कसे करण्यात आले पाहिजे यांच्यावर  पदाधिकाऱ्यांनी आपआपली मते मांडली. तर राज्यातील प्रायव्हेट इंग्रजी माध्यम  विनाअनुदानित  शिक्षकांच्या वेतना करीता शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. राज्यामध्ये सध्या खेळाडू पालक आणि क्रीडा शिक्षक यामधील चर्चेचा विषय झालेला  दहावी-बारावी ग्रेस गुणांबाबत शिक्षण मंत्री क्रीडामंत्री यांना निवेदन देण्यात द्यावे असे सुचविण्यात आले.


 तसेच शालेय क्रीडा स्पर्धाची  तयारी आयोजन व नियोजन कसे करायला पाहिजे. कोरोना बरोबर स्पर्धा कश्या झाल्या पाहिजेत या संदर्भात शासन स्तरावर मागणी करू, राज्यातील शिवछत्रपती   पुरस्कार प्राप्त खेळाडूंना शासनाच्या क्रीडा विभागामध्ये व अन्य विभागांमध्ये नोकरीमध्ये संधी दिली पाहिजे असा ठराव करण्यात.


     या सभेसाठी कार्याध्यक्ष गुलाबराव पाटीलसचिव अविनाश ओंबासे, उपाध्यक्ष संतोष पाठकप्रभाकर डोके, सोलापुरहुन आलेले नागेश शेट्टीकर, पुण्यावरून आलेले शिवाजी साळुंके, मुंबईवरून राहुल वाघमारेपालघरचे राजा मकवाना तसेच मितेश जैनउमेश काळेमयंक जाधवगणेश बागुल व आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार अविनाश ओंबासे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments