एकीकडे केडीएमसीत कोरोनाचा उद्रेक, दुसरीकडे शिवसेना नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नात तोबा गर्दी सर्व नियम धाब्यावर

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : एकीकडे केडीएमसीत कोरोनाचा उद्रेक झाला असून  दुसरीकडे शिवसेना नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नात तोबा गर्दी झाल्याची पाहायला मिळाली. या लग्न समारंभात सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. केडीएमसीत आज कोरोना चा उद्रेक झाला आहे. वर्षभरात एका दिवसांत 1244 रुग्ण पहिल्यांदा आढळून आले आहेत. नागरिकांना वारंवार आवाहन नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. काल मुख्यमंत्र्यांनी परत कोरोना टाळण्यासाठी काय काय केले पाहिजे हे सांगितले. यावेळी भाजपाला टोला सुद्धा लगावला मात्र त्यांचेच पदाधिकारी नगरसेवक मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत हे दिसून आले आहे.कारण कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले, शालिनी वायले यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात एकच गर्दी दिसून आली. सोशल डिस्टन्स तर सोडाच अनेकांच्या तोंडावर मास्क देखील नव्हते. विशेष म्हणजे लग्न समारंभासाठी वेळेची मर्यादा देखील आखुन दिली असतांना  वेळेच्या मर्यादे देखील उल्लंघन करण्यात आले आहे.सर्वांना नियम सांगणारे मुख्यमंत्री आता आपल्या पदाधिकाऱ्यांना काय सांगणार हा प्रश्न उभा राहिला आहे. एवढंच नाही तर डोंबिवली मध्ये आंदोलन करणाऱ्या मनसेच्या काही मोजक्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर कोपर आणि वडवली पुलाजवळ झालेल्या गर्दी संदर्भात गुन्हा कधी दाखल होणार असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला होता. आता या लग्न समारंभानंतर सेना मनसेत जुंपणार हे नक्की. 


तर दरम्यान या विवाह सोहळ्याला अनेक नेत्यांनी सुद्धा हजेरी लावली आहे.

Post a Comment

0 Comments