कल्याण डोंबिवलीत १२४४ रुग्ण तर ४ मृत्यू कोरोना रुग्णांनी ओलांडला ८२ हजारांचा टप्पा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ८२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज तब्बल १२४४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ८७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज चारमृत्यू झाले आहेत.
      आजच्या या १२४४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ८२,४२३ झाली आहे. यामध्ये९५९९ रुग्ण उपचार घेत असून ७१,५५८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२६६जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १२४४रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२०२कल्याण प – ४२२डोंबिवली पूर्व ३७१डोंबिवली प – १३२मांडा टिटवाळा -९६, तर मोहना येथील २१ रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments