कल्याण डोंबिवलीत ६४ हजार ३५७ नागरिकांचे लसीकरण
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असून हि रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रशासन अतोनात प्रयत्न करत आहे. त्यातच लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरु असून पालिका क्षेत्रात आतपर्यंत ६४ हजार ३५७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.


शासन निर्देशानुसार कल्याण डोंबिवलीमहानगरपालिकेच्या वतीने १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यातीलआरोग्यकर्मीपासून कोव्हीड १९  लसीकरणास सुरुवात झालेली असून ४ एप्रिल पर्यंत कल्याण डोंबिवलीतील ६४ हजार ३५७ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये १७ हजार १४८आरोग्यकर्मी ९ हजार ६८५ फ्रंट लाईन कोविड वर्कर, ४५ वर्षावरील ९ हजार ४२८ नागरिक आणि इतर २८ हजार ९६ नागरिकांचा समावेश आहे.  यामध्ये ५५ हजार ८६८ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ८ हजार ४८९ नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस देखील घेतला आहे.


लसीकरणासाठी सद्यस्थितीत महानगरपालिका क्षेत्रात एकूण १८ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहे. यामध्ये ६ केंद्र हेकल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे असून १२ केंद्र खाजगी आहेत. तर आणखी ४ खाजगी केंद्रांना मान्यता मिळाली असून ते अद्याप सुरु झालेले नाहीत. महापालिका क्षेत्रात शास्त्रीनगर रुग्णालय डोंबिवली प.बाई रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण प.सावळाराम क्रिडा संकूल डोंबिवली पू.विभागीय रेल्वे रुग्णालय कल्याण पू.प्रबोधनकार ठाकरे शाळानेतिवली कल्याण पू.आर्ट गॅलरी लालचौकी कल्याण प. या  शासकीय लसीकरण केंद्रावर कोविडची लस मोफत दिली जात आहे.


तर बाज आर आर हॉस्पीटल डोंबिवली पू.एम्स रुग्णालय डोंबिवली पू.श्री महागणपती हॉस्पीटल टिटवाळा पू.इशा नेत्रालय कल्याण प.स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल कल्याण पू.नोबेल हॉस्पीटल डोंबिवली पू.ऑप्टीलाइफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल डोंबिवली पू.सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी ॲन्ड कार्रडियाक केअर सेंटर कल्याण प.एसआरव्ही ममता हॉस्पीटल डोंबिवली पू.होलीक्रॉस हॉस्पीटल कल्याण प.श्वास मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल कल्याण प.डॉ.सी.बी वैदय मेमोरीयल हॉस्पीटल कल्याण प.या  १२ खाजगी रुग्णालयांमध्ये प्रती डोस २५० रुपये इतके शुल्क आकारुन ही लस घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Post a Comment

0 Comments