संत निरंकारी मिशनने आयोजित केलेल्या २ शिबिरांमध्ये १४९ युनिट रक्तदान रक्तटंचाई दूर करण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली रक्तटंचाई दूर करण्यासाठी सातत्याने योगदान देत असलेल्या संत निरंकारी मिशनच्या डिलाईल रोड व परळ शाखांकडून रविवारी  सिताराम मिल कंपाऊंड म्युनिसिपल स्कूल येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ९० निरंकारी भक्तांनी रक्तदान केले. तसेच मागील आठवड्यात रविवारी  मिशनच्या वडाळा शाखेने संत निरंकारी सत्संग भवननाडकर्णी पार्कवडाळा येथे आयोजित केलेल्या शिबिरामध्ये ५९ युनिट रक्तदान करण्यात आले. रक्त संकलनाचे कार्य का कार्य संत निरंकारी रक्तपेढीने केले. 


            डिलाईल रोडच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक गोपिनाथ बामुगडे यांनी केले तर वडाळा येथील शिबिराचे उद्घाटन मुंबई क्षेत्र नं.४ चे सेवादल संचालक शंकर सोनावने यांच्या हस्ते करण्यात आले. उल्लेखनीय आहे की २८ मार्च को होळीचा सण असतानाही प्रभु भक्तिच्या अनोख्या रंगामध्ये रंगलेल्या निरंकारी भक्तांनी श्रद्धाभक्ति व प्रेमाला महत्व देत मानवतेच्या सेवेमध्ये आपले योगदान देण्यामध्ये धन्यता मानली. दोन्ही शिबिरांमध्ये कोरोना महामारीच्या कालावधीत सरकारकडून जारी केलेल्या सर्व नियमांचे यथोचित पालन करण्यात आले.


      वडाळा येथील शिबिरामध्ये निरंकारी भक्तांचा सेवाभाव पाहून समाजसेवी सज्जन क्सन यांच्यासह काही सामाजिक व्यक्तींनी देखील स्वेच्छेने रक्तदान केलं. दोन्ही रक्तदान शिबिरे यशस्वी करण्यासाठी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजकसंत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक आणि सेवादल अधिकारी व स्वयंसेवक यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.

Post a Comment

0 Comments