आत्मविश्वास प्रतिष्ठानचे रक्तदान शिबीर

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोविड-१९ च्या महामारी मूळे राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्या मूळे रविवारी डोंबिवली पूर्वेतील  प्लाझ्मा ब्लड बँक येथे आत्मविश्वास प्रतिष्ठानगायकवाड वाडीडोंबिवली (पश्चिम) चे संपूर्ण पदाधिकारी आणि १५ ते २० सदस्य रक्तदान करण्यासाठी गेले होते.


यावेळी आत्मविश्वास प्रतिष्ठान  या संघटनेचेचे अध्यक्ष अक्षय गायकवाडउपाध्यक्ष करण गायकवाडसचिव प्रथमेश घायवट, सहसचिव जयेश ठाणेकरखजिनदार संदेश मोहितेसंघटक अजय पाटिलसंकेत गायकवाड तसेच प्रतिष्ठानचे सदस्य दीपेश पाठारेप्रणय गायकवाड, कल्पेश गायकवाडनिखिल घायवट, दीपेश पवार, अभिजित नागरपोळेशैलेश थोरात उपस्थित होते.


रक्तदान केल्या नंतर आत्मविश्वास प्रतिष्ठान संघटनेच्या  पदाधिकार्यांनी नागरिकांना रक्तदान करण्याचे आव्हान केले. राष्ट्रीय मानवाधिकार एव भ्रष्टाचार विरोधी संघटना ठाणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तसेच आत्मविश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय गायकवाड यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

Post a Comment

0 Comments