२७गावांचा पाणी प्रश्न उप मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नगरसेवक कुणाल पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट


■२७ गावांच्या समस्यांवर लक्ष देण्याची मागणी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली दखल....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांमध्ये सध्या पाणी, कचरा, रस्ते आदी समस्या गंभीर झाल्या आहेत. याबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सदस्य तथा अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन २७ गावांच्या समस्या उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारी मांडल्या आहेत.


कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांमधील मधील नागरिकांना फक्त आश्वासने देण्यात आली मात्र आश्‍वासनांची पूर्तता अजून झाली नसल्याने नागरिक देखील संतापले आहेत. सध्या उन्हाळा सुरू असून नागरिकांना पाणी टंचाई, कचरा आणि नादुरुस्त असलेल्या रस्त्यांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन २७ गावांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. अजित पवार यांनी या समस्या जाणून घेत या संबंधीत सर्व अधिकार्‍यांची बैठक घेत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

Post a Comment

0 Comments